• Sat. Sep 21st, 2024
एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; कोच अटेंडंटचे कृत्य, प्रवाशांनी शिकवला धडा

नागपूर: पाटलीपुत्र एक्स्प्रेसच्या वातानुकूलित (एसी) डब्यात कोच अटेंडंटने टॉयलेटमध्ये ९ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी अटेंडेंटला मारहाण केली. बुटीबोरी रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी ही घटना घडली. लोहमार्ग पोलिसांनी आरोपी मोहम्मद मन्नू (३०) याला अटक केली आहे.
सहकारी महिलेसोबत सेल्फी काढणे महागात; पत्नीला फोटो पाठवण्याची धमकी देत खंडणी, डॉक्टरला २० लाखांचा गंडा
मिळालेल्या माहितीनुसार, मुन्नू एका खासगी कंपनीमार्फत नऊ वर्षांपासून रेल्वेत कोच अटेंडंट म्हणून कार्यरत आहे. एसी कोचमधील प्रवाशांना बेडशीट, ब्लँकेट पुरवणे आणि गोळा करणे हे त्याचे काम आहे. मुन्नू विवाहित असून त्याला चार वर्षांचा मुलगा आणि दोन वर्षांची मुलगी आहे. त्याची ड्युटी २२३५२ बेंगळुरू पाटलीपुत्र एक्सप्रेसवर होती. या गाडीत पिडीत मुलगी तिची आई, आजी आणि भावासोबत एसी कोचमधून प्रवास करत होती. हे कुटुंब पाटण्याला जात होते. बुटीबोरीजवळ ही चिमुकली लघुशंका करण्यासाठी शौचालयात गेली. बराच वेळ तिच्यावर नजर ठेवून असलेला आरोपी मुन्नू सुद्धा तिच्या मागे शौचालयात गेला आणि आतून कुंडी लावली.

जरांगेंचं आंदोलन ही आग, त्यात हात घालाल तर भाजल्याशिवाय राहणार नाही, राजू शेट्टींचं सरकारला आवाहन

आरोपीच्या अश्लील वर्तनामुळे मुलगी घाबरली. ती रडायला लागल्यावर तिला पैसे देऊन गप्प बसायला सांगितले. काही वेळाने त्याने दार उघडला. दार उघडताच ती रडत रडत आईकडे गेली आणि तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार कथन केला. आई आणि आजीने डब्यात उपस्थित प्रवाशांना याची माहिती दिली. संतप्त प्रवाशांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती रेल्वे नियंत्रण कक्षालाही देण्यात आली. रेल्वे नागपूर स्थानकात पोहोचण्यापूर्वीच लोहमार्ग पोलिसांचे पथक फलाट क्रमांक एकवर आले आणि आरोपीला ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed