• Sat. Sep 21st, 2024
राजकीय ऑफर ही अतिशय गुप्त असते, पण शिंदेसाहेबांना…. : चंद्रकांत पाटील

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील बुधवारी सायंकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेच्या घरी जाऊन चाय पे चर्चा करून आले. शिंदेच्या निवासस्थानी बंद दाराआड चर्चा झाल्या. ही राजकीय भेट नव्हती. काही वर्षांपूर्वी सोलापुरात नाट्य संमेलन झाले होते. त्यावेळेस सुशीलकुमार शिंदे केंद्रीय ऊर्जा मंत्री होते. आणि त्या नाट्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष होते. ८८ व्या नाट्य संमेलनानंतर पुन्हा शंभरावं नाट्य संमेलन सोलापूर शहरात होत आहे. नाट्य संमेलनाच्या उदघाटनाला शिंदेना निमंत्रण देण्यासाठी आलो असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपची ऑफर होती असे स्वतः सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितल्याने राज्यभर राजकीय वादळ उठले आहे. परंतु भाजप मध्ये प्रवेश करणाऱ्यापैकी सुशीलकुमार शिंदे तर नक्की नाहीत, असं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खुलासा करताना सांगितले.

नितीन गडकरींचा उल्लेख

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे भाजपमध्ये २०१९ ला ही इच्छुक नव्हते आणि आताही नाही. भाजपकडून अधिकृत कुणी त्यांना ऑफर दिली नाही. शेवटी नात्याच्या आधारे, रिलेशनच्या आधारे, सुशीलजी येणार की नाही, असं कुणीतरी म्हटल असेल. विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसारखे आमचे नेते ते शिंदेचे चांगले मित्र आहेत.आता ही शिंदे यांनी नितीन गडकरी यांच्या आठवणी काढल्या. त्यातलं कुणी म्हणालं असेल तर ती काय राजकीय भेट म्हणता येणार नाही. किंवा राजकीय ऑफर म्हणता येणार नाही. राजकीय भेट ही तुम्हाला वर्षानुवर्षे कळत नाही. राजकीय भेट अतिशय गुप्त असते आणि इतक्या जाहीरपणे मी आलो. सगळे नाट्य संमेलनाचे पदाधिकारी बरोबर घेवून आलो. जेव्हा केव्हा त्यांची राजकीय भेट होईल. होईल की नाही माहित नाही. पण तेव्हा तुम्हाला कळणार ही नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

शिंदेचं कुटुंब अतिशय सुसंस्कृत, त्यांच्यावर कुणी शिंतोडे उडवू शकत नाही

सुशीलकुमार शिंदे सारख्या काही फॅमिलीज या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुसंस्कृत कुटुंब म्हणून प्रसिद्ध आहेत. शिंदे कुटुंबावर कधीही कोणी शिंतोडे उडवले नाहीत. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून प्रणितीताईही आक्रमक आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आक्रमक आहेत. अशी सुसंस्कृत फॅमिली आक्रमक प्रणिती ताई भारतीय जनता पार्टीत आल्या तर त्यांचं स्वागतच करू पण अशी कुठलीही ऑफर ना भाजपने दिली, ना अशी कुठलीही इच्छा त्यांनी व्यक्त केली, असंही चंद्रकांच दादा म्हणाले.

मला भाजप प्रवेशाची ऑफर कुणी दिली त्याचं नाव सांगणार नाही, पण मी काँग्रेसच्या विचारांचा, पक्ष सोडणार नाही : सुशीलकुमार शिंदे
राजकीय ऑफर ही गुप्त असते : चंद्रकांत पाटील

ही माझी केवळ सदीच्छा भेट होती. पालकमंत्री या नात्याने मी त्यांच्याकडे आलो आहे. आणि भाजपकडून कोणतीही ऑफर त्यांना देण्यात आलेली नाही. आणि कोणतीही राजकीय ऑफर अशी जाहीर पणे दिली जात नसते. ती गुप्त पद्धतीने असते, असंही सांगायला चंद्रकांत दादा सांगायला विसरले नाहीत.

मी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही, प्रणितीनेही स्पष्ट केलंय; सुशीलकुमार शिंदे यांना भाजपकडून ऑफर?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed