• Mon. Nov 25th, 2024
    फी न भरल्याने विद्यार्थ्याला परीक्षेतून उठवलं, वर्गाबाहेर काढलं, ठाण्यातील शाळेत प्रकार

    ठाणे : शाळेची फी न भरल्याने परीक्षा सुरु असताना विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढल्याचा प्रकार ठाण्यातील वर्तकनगर येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मंगळवारी सकाळी घडला. पालकांनी असे आरोप केल्यानंतर शाळेच्या आवारात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून शाळा प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गोंधळ घातला जात आहे. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी शाळेत धाव घेत राजकीय पदाधिकाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

    वर्तक नगरातील या शाळेची काही महिन्यांची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले नाही. यातील काही पालकांनी आम्ही ऑनलाईन फी भरल्याचे सांगितले. तसेच संबंधित प्रकाराने पालक चांगलेच आक्रमक झाले. पालकांनी शाळा प्रशासनाकडून सुरु असलेल्या पिळवणुकीविरोधात संताप व्यक्त करत शाळा प्रशासनाला धारेवर धरले.

    VIDEO | फ्लाईट रखडल्याचा राग, इंडिगोच्या पायलटला प्रवाशाचा विमानातच ठोसा, काय घडलं?
    आम्ही दर महिना फी भरतो. पण कधी तरी उशीर होतो त्यातही शाळा प्रशासनाकडून दंड आकारला जातो, ऑनलाईन फी भरलेली शाळेला मान्य नाही, शाळेत जर विद्यार्थी मराठीत बोलले तरी ५० रुपये दंड, मुलींनी शाळेत टिकली लावली तरी ५० रुपये दंड आकारण्यात येतो. तसेच विद्यार्थ्यांना फी भरण्यास उशीर झाला तर तुमची या शाळेत शिकण्याची लायकी नाही तुम्ही मराठी शाळेत शिका अशी भाषा शाळेच्या शिक्षकांकडून आणि मुख्यध्यापकांकडून वापरली जात असल्याचा आरोप पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी केला आहे.

    एकाच्या बाईकमध्ये मांजा अडकला, दुसऱ्या युवकाचा मदतीचा प्रयत्न आला अंगलट, पाय देताच…
    या प्रकरणानंतर शाळेच्या परिसरात राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेत प्रचंड गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने स्थानिक वर्तकनगर पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर शाळा प्रशासनाशी वारंवार संपर्क साधूनही होऊ शकलेला नाही.

    शाळांची वेळ उशिरा करावी या राज्यपालांच्या सूचनेबाबत विद्यार्थी, शिक्षक अन् पालकांना काय वाटतं?

    Read Latest Maharashtra Updates And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed