• Sat. Sep 21st, 2024

डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमागे बिघाडाचे शुक्लकाष्ट, गेल्या पंधरवड्यातील गाडी खोळंबण्याची चौथी घटना

डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमागे बिघाडाचे शुक्लकाष्ट, गेल्या पंधरवड्यातील गाडी खोळंबण्याची चौथी घटना

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबई-पुणेदरम्यान प्रवाशांच्या प्रथम पसंतीची रेल्वेगाडी असलेल्या डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमागे बिघाडाचे शुक्लकाष्ट लागले आहे. पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेस ब्रेक बायडिंगमुळे बुधवारी पळसदरी येथे पाऊण तास रखडली. गेल्या पंधरवड्यातील गाडी खोळंबण्याची ही चौथी घटना होती.

पुण्याहून मुंबईकडे निघालेली डेक्कन क्वीन एक्स्प्रेस घाट उतरल्यावर सकाळी सव्वाआठच्या सुमारास पळसदरी येथे पोहोचली. त्यावेळी वातानुकूलित डब्याच्या खालील भागातून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने गाडी थांबवण्यात आली. तपासणी केल्यानंतर सुमारे पाऊण तास विलंबाने अर्थात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही गाडी मुंबईसाठी रवाना झाली. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये अर्धा तास विलंबाने गाडी पोहोचली.

निवडणूक आयोग म्हणजे चोरांचा सरदार आणि आजचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंग पण शिवसेना संपणार नाही : संजय राऊत
नव्या वर्षापासून डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमध्ये बिघाडाच्या घटनांत वाढ झाली आहे. घाट उतरल्यावर वारंवार डब्याखालून प्रचंड धूर येत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. रेल्वे प्रशासनाने वेळीच योग्य देखभाल करून संभाव्य दुर्घटना टाळावी, असे एक्स्प्रेसमधील पासधारक प्रवासी योगेश देशमुख यांनी सांगितले.

१५ दिवसांत चार वेळा बिघाड

२७ डिसेंबर २०२३ – तळेगाव परिसर

१ जानेवारी २०२४ – पळसदरी

३ जानेवारी २०२४ – कुर्ला

१० जानेवारी २०२४ – पळसदरी

आमची घटना अवैध, मग आमदार वैध कसे? राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंची सडकून टीका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed