• Mon. Nov 25th, 2024
    लोकशाहीची निर्लज्जपणे हत्या, आता निकाल जनतेच्या न्यायालयात होईल: आदित्य ठाकरे

    कोल्हापूर : आदित्य ठाकरेंनी कोल्हापूरमध्ये बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. मूळ राजकीय पक्ष अध्यक्षांनी शिंदेंना दिला तर यापेक्षा लोकशाहीची निर्लज्ज हत्या दुसरी कोणतीही ठरत नाही, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

    आजचा दिवस महत्त्वाचा आहे, निकाल वाचन सुरु यासंदर्भात काही बोलत नाही. एकच महत्त्वाचं आहे देशासाठी महत्त्वाचे संकेत आहेत. येणाऱ्या २०२४ मध्ये जर अशी गद्दारी लेजिटीमायज झालं तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान भाजपला मान्य नाही आणि स्वत:चं संविधान लिहायचं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

    राहुल नार्वेकर आमच्या पक्षात होते त्यावेळी ते कुठल्या पक्षप्रमुखाचे आदेश घेत होते. ते कोणत्या पक्षप्रमुखाच्या एबी फॉर्मवर लढत होते. कुठच्या पक्षप्रमुखाच्या चिन्हावर लढत होते. दिवसाढवळ्या लोकशाहीची निर्लज्ज हत्या देशात ७५ वर्ष पाहिली नाहीत. सरकारची उलटतपासणी लोकशाहीत जनता करेल. सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे पण निकाल जनता करेल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
    शिंदेंची हकालपट्टी करण्याचा अधिकार ठाकरेंना एकट्याला नाही, नार्वेकरांचा ठाकरे गटाला धक्का
    हास्यास्पद गोष्ट अशी आहे की व्हिडिओ रेकॉर्डिंग निवडणूक आयोगाला दिलेलं आहे. जगाला कळलेलं आहे देशात लोकशाही मारली गेलेली आहे आणि हिटलराशी सुरु झालीय, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
    ४० पैकी १६ आमदारांच्या पात्रतेचा निकाल लागला, कोण पात्र ठरले? वाचा संपूर्ण यादी

    संजय राऊत काय म्हणाले?

    विधानसभेच्या अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयानं अधिकार दिले होते. त्यांना इतिहास रचण्याची संधी मिळाली होती. संविधानाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीनं महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असं संजय राऊत म्हणाले. जे या निर्णयावर टाळ्या वाजवत आहेत त्यांची स्थिती मुसोलिनी सारखी होईल, असं संजय राऊत म्हणाले. प्रभू श्रीरामाचं नावाचं नाव घेण्याचा या लोकांना अधिकार नाही, असं संजय राऊत म्हणाले. ६५ वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेची मालकी भाजपनं नेमलेला व्यक्ती शिवसेनेचं भविष्य काय ठरवणार? बाळासाहेबांची शिवसेना चोरमंडळाच्या हातात देण्याचा अधिकार कुणी दिला. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अशी अवस्था करणाऱ्यांना लोकं सोडणार नाहीत, असं संजय राऊत म्हणाले. शिवसेना यातून उभी राहील, असं राऊत म्हणाले.
    एकनाथ शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना, शिंदेंचे सगळे आमदारही पात्र, राहुल नार्वेकर यांचा निकालRead Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *