• Mon. Nov 25th, 2024
    सिगरेटची तलफ पडली महागात, दोन झुरके मारले अन् थेट वंदे भारतलाच ब्रेक; Video समोर

    छत्रपती संभाजीनगर : प्रवाशांच्या सोयीसाठी ताशी ११० किलोमीटरच्या वेगाने धावणाऱ्या मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन थाटात पार पडलं. मात्र, ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊन, अवघे काही दिवस झाले. असे असताना व्यसनाच्या आहारी गेलेल्या एका महाशयाने तलफ आवरता न आल्याने थेट वंदे भारत एक्सप्रेसच्या शौचालयात सिगारेट ओढली. दरम्यान, यामुळे अचानक एक्सप्रेसचा सायरन वाजला. प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये कर्मचाऱ्यांनी तपासणी करून सीसीटीव्ही तपासले असता सिगारेटच्या धुरामुळे सायरन वाजल्याचं वंदे भारत एक्सप्रेसच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं आणि यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

    दरम्यान, या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वंदे भारत एक्सप्रेसचं थाटात उद्घाटन पार पडलं. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यामुळे मुंबई जालना हा प्रवास प्रवाशांसाठी सोयीचा झाला. मात्र, मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता मुंबईहून रवाना झालेली वंदे भारत एक्सप्रेस नाशिक रेल्वे स्टेशनवर पोहोचणार तोच काही अंतरावर c5 या भोगीमध्ये अचानक सायरन वाजू लागला. प्रवास करत असलेल्या प्रवाशांमध्ये अचानक एकच खळबळ उडाली. सायरन वाजू लागल्याने नेमकं काय घडलं? हे कुणालाच कळेना झालं. यामुळे काही अंतरावर वंदे भारत एक्सप्रेस थांबवावी लागली. यावेळी तिकीट निरीक्षक व रेल्वे कर्मचाऱ्यांनी भोगीत जाऊन पाहणी केली असता सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. यावेळी एका प्रवाशाने बाथरूममध्ये जाऊन सिगारेट ओढल्याने हा प्रकार घडल्याचं लक्षात आलं.
    दहाव्या परिशिष्टातील ‘त्या’ नियमांचा वापर, आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी राहुल नार्वेकरांचं सूचक भाष्य
    दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला विचारपूस केली असता सुरुवातीला त्याने नकार दिला. मात्र, काही वेळानंतर त्याने सिगारेट ओढल्याची कबूली दिली. यावेळी त्याला नाशिक स्टेशनवरून वंदे भारत एक्सप्रेसमधून उतरवण्यात आलं. पुढील कारवाई रेल्वे कर्मचारी करत आहेत.

    शिंदे अपात्र ठरल्यास भाजपचा प्लान बी काय? कोण होणार मुख्यमंत्री? अशी असू शकतात समीकरणं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *