• Sat. Sep 21st, 2024
आधी तलवार घेऊन रिल्स बनवला; पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात, नंतर त्याचाच बनवला व्हिडिओ

नाशिकः सध्या सोशल मीडियावर डिजिटल कंटेंट क्रियेटर धुमाकूळ घालत आहेत. त्यात विविध पद्धतीच्या रिल्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल करून लाईक मिळवत आहेत. मात्र काही तरुणांकडून सोशल मीडियावर धारदार शस्त्र हातात घेऊन दहशत माजवली जात आहे. आता पोलिसांनी कारवाईचा भडगा उचलला असून नाशिकमध्ये हातात धारदार तलवार घेऊन रिल्स तयार करून सोशल मीडियावर दहशत माजविणाऱ्या तरुणावर कारवाई केली आहे.
माजी नगराध्यक्षांच्या लेकावर काळाचा घाला, टेम्पोवर कार आदळून भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू
नाशिक शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने धारदार तलवारसोबत घेऊन इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकून दहशत पसरवणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. गुंडा विरोधी पथकातील अंमलदार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, इंस्टाग्रामवर दिपक यादव नावाच्या संशयित तरुणाने दहशत निर्माण करण्यासाठी तलवार हातात घेऊन फोटो पोस्ट केला. दरम्यान, पोलिसांनी या अंकाऊंटवरील माहिती मिळवून अंबड सातपुर लिंकरोडवरील संजीव नगर परिसरातील इंडीयन ऑईल पेट्रोल पंपासमोर असलेल्या सनराईज रोलींग शटर या दुकानात मजुर म्हणून काम करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले.

मातोश्रीच्या कुठल्या वहिनी रवींद्र वायकरांच्या पार्टनर आहेत? | नितेश राणे

मूळचा उत्तर प्रदेशमधील असलेल्या या युवकाला अटक करून त्याच्याकडून एक लोखंडी धारदार तलवार आणि एक लोखंडी गुप्ती ताब्यात घेतली आहे. या संशयिताविरोधात बेकायदेशीर हत्यार बाळगणे आणि मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा पद्धतीने सोशल मीडियावर दहशत माजविणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. त्यामुळे आता पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर राहणार असून यापुढे अशा पद्धतीच्या व्हिडिओ टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा देखील इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed