• Sat. Sep 21st, 2024
कृषी पदविका करुन नोकरी मिळेना, दूध व्यवसाय तोट्यात, मराठा युवकाचं आरक्षणासाठी टोकाचं पाऊल

धाराशिव : मराठा आरक्षणासाठी बलfदान देत आहे.सरकारने जागे व्हावे.आरक्षण द्या अशी चिठ्ठी लिहून रोहन भातलवंडे या तरुणानं आत्महत्या केली. यामुळं दहिफळ गावावर शोककळा पसरली आहे. मराठा आरक्षणसाठी धाराशिव जिल्हयात पुन्हा एकदा १९ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. कळंब तालुक्यातील दहिफळ येथे दि ४ जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास रोहन राजेंद्र भातलवंडे या १९ वर्षाच्या तरुणाने चिठ्ठी लिहून मराठा आरक्षणसाठी गळफास घेतला आहे.शेतातील बांधावर असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली आहे.

दहिफळ येथील १९ वर्षीय रोहन राजेंद्र भातलवंडे याचे १० वी पर्यंत शिक्षण झाले असून त्याने कृषी पदविका डिप्लोमा कोर्स केला आहे.नोकरीच्या शोधात फिरला परंतु त्याला कुठे नोकरीची संधी मिळाली नाही. अखेर रोहन यानं दहिफळ गावात दुधडेअरीचा व्यवसाय सुरू केला.दुधाचा व्यवसाय चालवत असताना स्वःताच्या तीन गायी सांभाळत होता. दुधाचा दर कमी-जास्त होत होता.या व्यवसायात नफा कमी तोटा अधिक होत आहे हे लक्षात आले.आपण कृषी पदविका शिक्षण घेऊन काय फायदा झाला.कुठे नोकरीची संधी उपलब्ध होत नाही.जर आरक्षण असते तर कुठे तरी संधी मिळाली असती.तो सतत आपल्या विचारात एकांतात वावरत होता.

दहिफळ येथे ३ जानेवारी रोजी मराठा आरक्षणासाठी बैठक घेण्यात आली होती.आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील जीवाची बाजी लावत आहेत.अखेरची लढाई सुरू आहे.सरकारने लवकर आरक्षण जाहीर करावे यासाठी दबाव वाढत आहे.आंदोलने होत आहेत.सकल मराठा समाज एकवटला आहे.आझाद मैदानावर २० जानेवारी रोजी जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत.त्यांच्या पायी दिंडीत सहभागी होण्यासाठी गावात बैठक घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

बैठकीच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी दुःखद घटना घडली आहे. मराठा आरक्षणासाठी मी बलिदान देत आहे.सरकारने जागे व्हावे व मराठ्यांना आरक्षण जाहीर करावे असा मजकूर लिहून रोहन राजेंद्र भातलवंडे याने गळफास घेऊन जीवन संपविले आहे.
Sharad Mohol : शरद मोहोळच्या मारेकऱ्याची ओळख पटली, पुणे पोलिसांकडून मोठी अपडेट, सोबतच्या व्यक्तीनं गोळी चालवली
एकीकडे आरक्षणासाठी जोरदार आंदोलन सुरू आहे.तर युवक हताश होऊन गळफास घेऊन आत्महत्या करत आहेत. सरकारचे हे अपयश आहे.तरुणांना पुरक व्यवसायासाठी आर्थिक मदत देण्यास सरकार कमी पडले आहे.शिक्षण घेऊन सुशिक्षित बेकार म्हणून फिरावे लागत आहे.हताश होऊन अनेक तरुण युवक आपले जीवन संपवित आहेत. मराठा आरक्षणासाठी दहिफळ येथील पहिला बळी गेला आहे, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.
जितेंद्र आव्हाडांचे वक्तव्य वादात; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले – बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ
दि.४ जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास रोहन राजेंद्र भातलवंडे याने चिठ्ठी लिहून गळफास घेतला आहे. गायीचे दूध काढून चिठ्ठी लिहून आपले जीवन संपविले आहे.ही घटना परिसरात कळाली सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये दत्ता नानासाहेब भातलवंडे यांनी फिर्याद दाखल केली असून पीएसआय विलास जाधव यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. रात्री प्राथमिक आरोग्य केंद्रात पोस्टमार्टम डॉ राऊत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.तसेच प्रेत कुटुंबाच्या हवाली केले.राजेंद्र भातलवंडे यांच्या शेतात रोहन याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी गावकरी नातेवाईक उपस्थित होते.
अफगाणिस्तानच्या टी-२० मालिकेसाठी कसा असेल भारतीय संघ, जाणून घ्या Playing xi
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed