• Sat. Sep 21st, 2024
भंडाऱ्यातील सनफ्लॅग कंपनीत पहाटे भीषण स्फोट, ३ कामगार जखमी; स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत आज पहाटे ३.१५ वाजता स्फोट झाला. यात ३ कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात तात्काळ हलवण्यात आले. या दुर्घटनेत ७ – ८ कामगार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

सदर घटना कंपनीतील एसएमएस या विभागातील एलएचएफ युनिटमध्ये झाली. घटनेचे मूळ कारण अजून गुलदस्त्यात असून हिटिंग फरनेस मध्ये अचानक मोठा स्फोट झाल्याने तारांबळ उडाली. या भागात कार्यरत ३ कामगार काही प्रमाणात भाजल्या गेले व काही कामगारांना किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यात टेक्निसीयन नामदेव झंझाड, अभियंता सागर गभने व कंत्राटी कामगार हटवार हे जखमी झाले. त्यांना नागपूर येथे हलवण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली.

शिवसेना-भाजपची बॅनरबाजी, प्रचाराची चढाओढ; मलंगगडाच्या पायथ्याला अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
स्फोट एवढा भयानक होता की कंपनीतील जवळपास असलेले परिसर हादरले होते. या दुर्घटनेत कंपनीतील सामानाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने प्राणहानी झाली नाही.
पाणबुडी प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची चर्चा, मुख्यमंत्री म्हणतात, नव्या वर्षात आणखी नवे प्रकल्प येणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed