• Mon. Nov 25th, 2024

    कचऱ्याच्या टिप्परची धडक, बहीण-भावाचा मृत्यू, संतप्त जमावाने टिप्परच पेटवला, नागपुरात तणाव

    कचऱ्याच्या टिप्परची धडक, बहीण-भावाचा मृत्यू, संतप्त जमावाने टिप्परच पेटवला, नागपुरात तणाव

    नागपूर: एका टिप्परने बहीण-भावाला चिरडल्यामुळे वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत बिडगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने टिप्पर पेटविला. यामुळे या परिसरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

    अंजली ननेलाल सैनी (वय २०) आणि सुमित ननेलाल सैनी (वय १५ दोघे. रा. अंबेनगर बिडगाव) अशी मृतकांची नावे आहेत. वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत भांडेवाडी डम्पिंग यार्ड आहे. या परिसरात कचरा उचलणाऱ्या टिप्परची सतत ये-जा सुरु असते. दरम्यान, बिडगाव चौकात दुचाकीवरून जात असलेल्या अंजली आणि सुमित यांना कचरा उचलणाऱ्या भरधाव टिप्परने चिरडले. यामुळे घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. संतप्त जमावाने टिप्परला आग लावली. घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला.

    टिप्परला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या वाहनाला पाचारण करण्यात आले. परंतु संतप्त नागरिकांनी अग्निशमन दलाच्या वाहनावरही दगडफेक करून त्या वाहनाच्या काचा फोडल्या. त्यानंतर गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सदर्शन, झोन चारचे उपायुक्त विजयकांत सागर आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. जमाव संतप्त होत असल्याचे पाहून राज्य राखीव दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलला रवाना केले.

    क्षणात कोट्यवधींची मालकीण झाली, पण श्रीमंती टिकवता आली नाही, एक चूक अन् तिने सारं गमावलं
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *