• Mon. Nov 25th, 2024
    दुरंतो एक्सप्रेसमध्ये भलताच उद्योग, पोलिसांना कुणकुण, गोदामात छापा टाकला अन्…, रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई

    मुंबई: रेल्वेतून अनेक वस्तूंची तस्करी केल्याचे अनेकदा समोर आले आहे. मात्र पश्चिम रेल्वेच्या सतर्कता टीमने अवैधरित्या सुरू असलेले २४० किलो चांदीचे दागिने जप्त केले आहेत. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या १२२६८ क्रमांकाच्या हापा – मुंबई सेंट्रल दुरंतो एक्सप्रेसचा कर वाचवण्यासाठी दागिने पार्सलमधून आणण्यात आले होते. मात्र यासंबंधी माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी कारवाई केली.
    कचऱ्याच्या टिप्परची धडक, बहीण-भावाचा मृत्यू, संतप्त जमावाने टिप्परच पेटवला, नागपुरात तणाव
    पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुरंतो एक्सप्रेसमधून मुंबई सेंट्रल स्टेशनवर बिना डिलिवरी घेता समान बाहेर नेले जात होते. या सामानाचा फक्त १३४७ रुपये इतकाच कर भरला होता. मात्र सतर्कता टीमने चौकशी केल्यानंतर काही सामानाची नोंद आवक गोदामात करण्यासाठी सोडण्यात आले आहे. मात्र सतर्कता टीम गोदामात पोहचली. त्यावेळी तिथे काहीच आढळून आले नाही. त्यावेळी शंका आल्याने टीम ट्रक लोडींग भागात पोहचली. त्यावेळी सतर्कता टीमने आणि रेल्वे पोलिसांनी हे सामान ताब्यात घेतले.

    शिवाजी पार्क अन् आझाद मैदानाची पाहणी सुरु; मुंबईतील मराठा मोर्चासाठी मनोज जरांगे पाटलांची तयारी जोरात

    या सामानाची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये चांदीच्या दागिन्यांचे सहा बंडल आढळून आले. या दागिन्यांचे वजन २४० किलो इतके आहे. तर याची किंमत १ कोटी ३४ लाख असल्याची माहिती सुमित ठाकूर यांनी दिली. तसेच हे दागिने जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये पार्सल सेवा शुल्क वाचवण्यासाठी चुकीची माहिती दिल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे संबंधित दागिने जप्त करण्यात आले असून रेल्वे अधिनियम कलम BTT CR 2003/2023 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed