• Sat. Sep 21st, 2024

रात्रीच्या अंधारात हत्तीच्या कळपाचा घरांवर हल्ला, मोठ्या प्रमाणात नासधूस, पाच कुटुंबे उघड्यावर

रात्रीच्या अंधारात हत्तीच्या कळपाचा घरांवर हल्ला, मोठ्या प्रमाणात नासधूस, पाच कुटुंबे उघड्यावर

गडचिरोली : रात्री झोपत असताना हत्तीच्या कळपाने गावात शिरून घरावर हल्ला केला. हत्तींची किंचाळी ऐकून पाच कुटुंबे जीवाच्या भीतीने घर सोडून मागच्या दाराने बाहेर पडली. जीव वाचला, पण घरांची नासधूस केल्याने ही कुटुंबे उघड्यावर आली आहे. आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथे रविवारी मध्यरात्री ही थरार घटना घडली.

गोंदियाकडे वळलेल्या रानटी हत्तींचा कळप पुन्हा माघारी फिरला आहे. पाथरगोटा येथे रविवारी मध्यरात्रीनंतर २० ते २२ रानटी हत्तींनी पाच घरांवर चाल केले. सुरुवातीला अशोक वासुदेव राऊत यांच्या घराचा दरवाजा ठोकला. त्यांनी आरडाओरड करून शेजाऱ्यांना जागे केले. त्यामुळे या परिसरातील घरातील सर्व सदस्य जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडले. अशोक राऊत, सूरज दिघोरे, मंगला प्रधान ,चंद्रशेखर बघमारे, दुर्गादास बघमारे यांच्या घरांची हत्तींनी नासधूस केली. यानंतर संपूर्ण गाव जागे झाले, पण जीवाच्या भीतीने कोणीही घराबाहेर पडले नाही. गावकऱ्यांनी वनविभागाला कळविले. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी गावात दाखल झाले. हुल्ला पार्टीच्या मदतीने हत्तीच्या कळपाला हुसकावून लावले. दरम्यान, या पाच कुटुंबांना तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करुन भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

वर्ध्यात शेतकऱ्याच्या फार्म हाऊसवर दरोडा

वर्ध्यातील कारंजा तालुक्यात दरोडेखोरांनी शेतकऱ्याच्या फार्महाऊसवर दरोडा टाकत सोन्याचे दागिने आणि ५५ पोती सोयाबीन लुटून नेल्याची घटना घडली. यावेळी प्रतिकार करणाऱ्या शेतकऱ्यावर दरोडेखोरांनी चाकूने वार केले त्यामुळे शेतकरी गंभीर जखमी झाला. पळून जाताना दरोडेखोरांनी गाडीच्या वाहनातील हवा सोडून दिली . मात्र, त्याही अवस्थेत शेतकऱ्याने पोलीस ठाणे गाठत घडलेल्या घटनेबाबत फिर्याद दिली.

कोल्हापुरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस; आठवड्याभरात ४०० हून अधिक जण जखमी

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed