• Sat. Sep 21st, 2024

भाजपकडून कसब्यात पुन्हा हेमंत रासनेच? चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले संकेत, वाचा नेमकं काय म्हणाले?

भाजपकडून कसब्यात पुन्हा हेमंत रासनेच? चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले संकेत, वाचा नेमकं काय म्हणाले?

पुणे: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा हक्काचा असणारा मतदारसंघ त्यांना गमवावा लागला. या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला. त्यानंतर भाजपने कसबा पेठ विधानसभा मतदार विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. मात्र पराभवनंतर देखील हेमंत रासनेच भाजपचे उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष मीच, कोणाला उमेदवारी द्यायची हे मी ठरवेन, शरद पवार स्पष्टच म्हणाले
देशभरात “नमो चषका”चे आयोजन करण्यात येत असून आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते कसबा मतदारसंघात महाराष्ट्रातील नमो चषक स्पर्धेच्या नोंदणीचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना बावनकुळे यांनी पुन्हा एकदा कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात हेमंत रासने हेच उमेदवार असतील असे संकेत दिले आहेत. पोटनिवडणुकीत हेमंत रासने यांचा पराभव काही मतांनी झाला, तरी निवडणूक हरले त्या दिवसापासून पराभवाची चिंता न करता ते आता जिद्दीने काम करत विजयाकडे वाटचाल करत आहेत. येत्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ते निश्चित यश मिळवतील. रासने हे अत्यंत कर्तव्यदक्ष, कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिकपणे धर्मनिष्ठने काम करणारे आहेत, असा विश्वास यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

अजितदादांनी शिरुरसाठी दंड थोपटले, अमोल कोल्हे म्हणाले; जनता सुज्ञ, ती ठरवेल कोणाच्या बाजूने राहायचं…!

दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या पुत्र कुणाल टिळक हे मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. पण भाजप पक्षश्रेष्ठींनी हेमंत रासने यांच्या नावाला पसंती दिली. हेमंत रासने यांच्या उमेदवारीमुळे कसब्यातील भाजपचा पारंपारिक मतदार नाराज झाला असल्याची चर्चा होती. आणि त्याचा फटका देखील भाजपला निवडणुकीत झाला आणि त्यामुळेच हेमंत रासने पराभव झाला, असं राजकीय पंडित म्हणत आहेत. मात्र आता पुन्हा एकदा कुणाल टिळक यांच्या समोरच चंद्रशेखर बावनकुळे यांनी हेमंत रासने यांचा उमेदवारीचे संकेत दिल्याने कसब्यात भाजपात नवा संघर्ष पाहायला मिळू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed