• Mon. Nov 25th, 2024
    जालना मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस कधी सुरु होणार, रावसाहेब दानवेंनी दिली मोठी अपडेट

    जालना : जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा अखेर मुहूर्त ठरला आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार ३० डिसेंबर रोजी जालना रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना होईल. मुंबई जालना दरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस ही आठ डब्यांची असेल. रावसाहेब दानवे जालना येथे पत्रकारांसोबत बोलत होते.

    जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडीचा मुहूर्त ठरला असून ३० डिसेंबर रोजी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रेल्वेला सुरुवात केली जाणार आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही माहिती दिली आहे. जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडी सकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी धावणार असून ३० डिसेंबर रोजी ११ वाजता जालना रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून विशेष रेल्वेला सुरुवात केली जाणार आहे.

    आज माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त जालन्यातील भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास जलदगतीने होण्यास मदत होणार असून व्यापारासाठी तसेच मंत्रालय वगैरे अशा कामांसाठी जाणाऱ्यांना फायदेशीर असणार आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

    मुंबई-जालनादरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस ही आठ डब्यांची असेल. देशातील ४४ वी आणि ४६ वी वंदे भारत एक्स्प्रेस मध्य रेल्वेला मिळणार आहे.
    पुणेकरांवरील पाणीकपातीची संभाव्य टांगती तलवार अजित पवार यांनी दूर केली; म्हणाले, फेब्रुवारीत…

    कसं असेल वेळापत्रक?

    जालना आणि मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला चार थांबे असतील. दक्षिण मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक आणि ठाणे आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईला गाडी पोहोचेल.

    सकाळी जालना रेल्वे स्थानकातून पहाटे ५.०५ मिनिटांनी ही गाडी सुटेल, ५.५३ ला छत्रपती संभाजीनगर, नाशिकमध्ये सकाळी ८.३८ ला ही ट्रेन पोहोचेल. तर, ठाणे स्थानकात ११. १० वाजता तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे ही एक्स्प्रेस ११.५५ ला पोहोचेल. प्रत्येक स्थानकावर ही एक्स्प्रेस २ मिनिटं थांबेल.
    हिंमत असेल तर २२ जानेवारीला प्रत्यक्ष या, मंदिर कसे उभारले आहे ते दाखवून देऊ; देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी १.१० वाजता जालना स्थानकाकडे जाण्यासाठी मुंबईहून वंदे भारत एक्स्प्रेस सुटेल. ठाण्यात १ वाजून ४० मिनिटांना पोहोचेल. नाशिकमध्ये सायंकाळी ४.२८ वाजता ही एक्स्प्रेस पोहोचेल. छत्रपती संभाजीनगरला ७.०८ ला तर जालन्यात रात्री ८.३० वाजता ही ट्रेन पोहोचेल.
    शिवतारेंना सांगून पाडलं, आता कोल्हेंनाही चॅलेंज, अजित पवार शिरूरमध्ये आढळराव पाटलांना तिकीट देणार?
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed