• Sat. Sep 21st, 2024
स्वत:ला वाचवू शकत असाल तर वाचवा, खासदार हेमंत पाटील यांना खलिस्तानी दहशतवाद्याची धमकी

गजानन पवार, हिंगोली : हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांना फोनद्वारे खलिस्तानी दहशतवदी पन्नू याने लंडनमधून धमकी दिली आहे. तसेच २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कार्यक्रमात हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत खासदार पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहित माहिती दिली आहे. धमकी मिळाल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांच्या सुरक्षेत आता वाढ केली असल्याचे सांगण्यात आले आहे.

लंडन येथून आंतरराष्ट्रीय मोबाईल फोन नंबरवरून धमकी दिली असून येणाऱ्या २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे होणारा कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी दिली आहे.
खासदार हेमंत पाटील यांनी लागलीच (20) डिसेंबर रोजी केंद्र आणि राज्य सरकारला याबाबत पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. तर 22 डिसेंबर पासून पोलिसांनी त्यांच्या सुरक्षित वाढ केली आहे व घरासमोर देखील बंदोबस्त वाढवला आहे.

हक्कभंगाच्या इशाऱ्यानंतर सुषमा अंधारेंनी ठणकावून सांगितलं, ‘तुरुंगात जाईन पण माफी अजिबात मागणार नाही’
खासदार हेमंत पाटील यांना १४ डिसेंबर रोजी रात्री १० वाजताचे सुमारास लंडन येथून आंतरराष्ट्रीय मोबाईल फोन द्वारे धमकी दिली होती. यामध्ये लंडन येथून पन्नू नावाच्या खलिस्तानी दहशतवाद्यांनी २६ जानेवारी रोजी दिल्ली येथील होणाऱ्या सोहळ्या बाबत धमकी दिली आहे. यामध्ये 26 जानेवारी रोजी होणारा सोहळा हा आम्ही उधळून टाकू अशी इंग्रजीत बोलत धमकी दिली.

या घटनेनंतर खासदार हेमंत पाटील यांनी लागलीच केंद्रीय गृहमंत्र्यालयासह राष्ट्रपती, पंतप्रधान कार्यालय आणि राज्य सरकारलादेखील याबाबत पत्र पाठवून कळविले आहे. यावर केंद्र सरकारने गांभीर्याने घेऊन सतर्क राहावे असं देखील पत्रात नमूद केले आहे. त्यांनी दिल्ली येथे जाऊन पत्र दिल्याचे कार्यालयातून सांगण्यात आले.
यानंतर खासदार हेमंत पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून घरासमोर देखील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून एसआयटी सोबत एस.पी.युचे जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

भारतातील पहिला लिगो प्रकल्प हिंगोलीत, लवकरच पंतप्रधान मोदी भेट देणार | हेमंत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed