• Sat. Sep 21st, 2024
गावरान कोंबडीच्या व्यवसायातून दहावी पास तरुण मालामाल, प्रत्येक महिन्याला लाखभर नफा

सिंधुदुर्ग : कोकणातील बहुतांश तरुण बॉयलर कोंबडी व्यवसायाकडे वळत असले, तरी रिस्क घेण्याचं फारसं धाडस करताना दिसत नाहीत. उलट गावरान कोंबडी व्यवसायात धोका कमी असल्यामुळे कोकणातला युवक त्याकडे वळताना सध्या पाहायला मिळत आहे. गावरान कोंबडी व्यवसायात कोंबड्यांचा मृत्यू होण्याचं प्रमाण नगण्य आहे. दहावी शिकलेल्या तरुणाने हा व्यवसाय करुन लाखो रुपयांचा नफा कमवला.

सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील आचरा गावात राहणाऱ्या महम्मद शेख यांचं शिक्षण कमी असलं, तरी नाराज न होता परिस्थितीला सामोरे जात त्याने आपला पोल्ट्री व्यवसाय मेहनतीच्या जोरावर दिमाखात उभा केला. कोणता व्यवसाय करायचा याबाबत घरामध्ये नेहमी चर्चा व्हायची. शेतीची आवड ही पूर्वीपासून होती. मात्र शाश्वत व्यवसाय असावा असं शेख यांना नेहमी वाटायचं म्हणून महम्मद शेख यांनी देवगड तालुक्यातील पोयरे गावांमध्ये जमीन घेऊन गावरान पोल्ट्री व्यवसाय सुरू केला.

महम्मद शेख यांचं दहावीपर्यंत शिक्षण झालं आहे. माझा भाऊ आणि माझ्या कुटुंबामध्ये नेहमी चर्चा व्हायची. अॅग्रिकल्चर आणि पोल्ट्री व्यवसायामध्ये पदार्पण करण्याचा विचार केला. त्यानंतर गावरान कोंबडी फार्म सुरू केला. या गावरान कोंबडी व्यवसायामध्ये धोका कमी असतो, असे शेख सांगतात.

१६ महिन्यांत पाच वेळा हार्ट अटॅक, मुंबईतील ५१ वर्षीय महिलेचा मृत्यूला चकवा, डॉक्टरही संभ्रमात
गावरान कोंबडीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती अधिक असते. म्हणून हा व्यवसाय सुरू केला. जेवढी बॉयलर कोंबड्यांची काळजी घ्यावी लागते, तेवढी काळजी गावरान कोंबड्यांची घ्यावी लागत नाही. त्यामुळे जास्त काळ कोंबड्या टिकून राहू शकतात. बॉयलर कोंबडीचं आयुष्यमान फार कमी असतं. बॉयलर कोंबड्यांची वाढ अधिक झाल्यामुळे काही कोंबड्यांचा मृत्यू देखील होतो. मात्र गावरान कोंबड्यांचं तसं होत नाही, तर त्या अधिक काळ टिकून राहतात.

एका दिवसाची गावरान कोंबड्यांची पिल्लं सुरुवातीला आणली जातात. ९० दिवस त्यांची देखभाल केली जाते. विविध प्रकारच्या लसी देखील दिल्या जातात. त्यानंतर ७० ते ८० दिवसांनंतर विक्री करायला सुरुवात केली जाते. शेख यांनी जवळपास ८ शेड उभारले आहेत. रोटेशन प्रमाणे प्रत्येक शेडमध्ये २ हजारांची बॅच तयार केली जाते.

लेकीच्या लग्नानंतर ८ कोटींचे दागिने रिक्षात विसरले, बाबांना ब्रह्मांड आठवलं, पुढच्या तासाभरात…
वर्षाचे बाराही महिने रोटेशन प्रमाणे गावरान कोंबडी सांभाळल्या जातात. त्यामुळे लोकल मार्केटला चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी गावरान कोंबडी वर्षाचे बारा महिने केली जात नाही त्यामुळे त्यांच्याकडे ग्राहक वळत नाही. या गावरान कोंबड्यांसाठी मार्केट सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच आहे. काही मार्केट गोवा राज्यातही आहेत. जर काही जादा कोंबड्या शिल्लक राहिल्या, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाठवल्या जातात.

पंचक्रोशीचा विश्वास जिंकला; १६०० लीटर दुधापासून श्रीखंड, लस्सी,पनीर बनवत जालन्याच्या तरुणाची लाखोंची कमाई

सध्या या लोकल मार्केटमध्ये १८० ते १९० या दराने किलो प्रमाणे दर दिला जातो. दोन दोन हजाराप्रमाणे दोन बॅचेस काढल्या जातात. म्हणजे किमान ४ हजार पक्षी हे मार्केटमध्ये विकले जातात. त्यामुळे यातून एक लाख वीस हजार रुपये नफा इतर खर्च वजा करून मिळतो असे व्यावसायिक महम्मद शेख सांगत आहेत.

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed