• Sat. Sep 21st, 2024
मराठा समाजाला २४ डिसेंबरपूर्वी आरक्षण मिळणार,  मनोज जरांगेंना विश्वास अन् सरकारला इशारा

जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात विधानसभेत केलेल्या निवेदनानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेऊ आरक्षण देऊ, अशी भूमिका मांडली होती. यानंतर मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. सरकारनं १९६७ च्या अगोदरच्या ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना सरकार नोंदी देणार आहे. नातेवाईकांना रक्ताच्या नातेवाईकांना आरक्षण देण्यासाठी कायदा करावा, असं मनोज जरांगे म्हणाले. मराठा समाजाला २४ डिसेंबर पूर्वी आरक्षण मिळेल, असं मनोज जरांगे म्हणाले.

फेब्रुवारीचा विषय या नोंदीसंबधांत नाही. सुप्रीम कोर्टातील लढा वरचं आरक्षण टिकवण्यासाठी आहे. २४ डिसेंबरच्या आत मराठा समाजाला १०० टक्के आरक्षण लागू होणार, असं जरांगे म्हणाले. ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत, त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना लाभ मिळण्यासाठी सरकार काय करणार, असा सवाल जरांगे यांनी केला.

महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार हे ठामपणे मिळेल. सरकारनं सरसकट हे शब्द घेऊन आरक्षण द्यावं. सरकारनं गोंधळ दूर करावा, असं जरांगे म्हणाले. सरकारनं आम्हाला अंधारात ठेवलं तर आंदोलनाची दिशा जाहीर करावी लागेल, असं जरांगे म्हणाले.
शिर्डी ग्रामस्थांना विश्वासात न घेता कारभार करणं भोवलं,साई संस्थानाच्या CEOना तात्काळ कार्यमुक्त होण्याचे आदेश
राज्यात ५४ लाख लोकांच्या नोंदी मिळाल्या आहेत. त्यांच्या रक्ताच्या सोयऱ्यांना लाभ दिले जातील. फेब्रुवारीपर्यंत मागासवर्ग आयोगाचा अहवाल येईल, असं सांगितलं जातं आहे. आम्ही ती मागणी केलेली नाही. ते आरक्षण टिकेल की नाही टिकेल असे अनेक प्रश्न आहेत. ५० टक्क्यांच्यावर जाणारं आरक्षण टिकणार नाही, पुन्हा मराठ्यांचा घात होणार आहे, असं जरांगे म्हणाले.
मागासवर्ग आयोगाचा महिनाभरात अहवाल येईल, मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन : CM शिंदे
आम्हाला २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण द्यावं ते दिलं नाही तर आम्ही आंदोलन सुरु करणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. सरकारनं ते दोन शब्द सांगावेत. त्यांच्या तज्ज्ञानं ते शब्द लिहिलेले आहेत. सरकारचा खरेपणा दिसून आला, असंही जरांगे म्हणाले. सरकार मराठ्यांना ओबीसींना आरक्षण देतील असं वाटतंय. सरकारनं आरक्षण नाही दिलं तर २४ डिसेंबर पासून आंदोलन सुरु करु, असं मनोज जरांगे म्हणाले.
मुलींच्या बेपत्ता होण्याची कारणं काय? फडणवीस म्हणाले, प्रेमसंबंधांमधून अल्पवयीन मुली पळून जातायेत
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed