• Mon. Nov 25th, 2024
    रात्री अचानक व्यक्तीचा टोकाचा निर्णय, सकाळी पत्नीसह मुलाला बसला धक्का, चिठ्ठीत धक्कादायक कारण समोर

    जळगाव: आजारपण आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने जळगाव तालुक्यातील धानवड येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे पाच वाजता उघडकीस आली आहे. शिवाजी चिंधा पाटील (५५, रा. धानवड ता.जि. जळगाव) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आजाराला कंटाळलो डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे.
    दोन वर्षापासून फरार होता, रिवॉल्वर घेऊन पेट्रोल पंपावर आला आणि तिथेच गेम झाला…!
    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील धानवड येथे शिवाजी चिंधा पाटील आपले पत्नी, दोन मुलं आणि नातवंडे यांच्यासह वास्तव्याला आहेत. मंगळवारी पहाटे ५ वाजता त्यांनी राहत्या घराच्या मागच्या खोलीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहलेले सुसाईड नोट आढळून आली आहे. चिठ्ठीत आजाराला आणि कर्जाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे” असे नमूद केले आहे. कर्ज आणि आजारपणामुळे ते गेल्या काही दिवसांपासून ते विवंचनेत होते. अखेर त्यांनी आज पहाटे टोकाचा निर्णय घेतला.

    संसदेच्या पायऱ्यांवर खासदाराकडून उपराष्ट्रपतींची नक्कल; राहुल गांधी आधी पाहत राहिले, मग फोनमध्ये व्हिडिओ शूट

    सकाळी कुटुंब उठलं असता त्यांना शिवाजी पाटील यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून शिवाजी पाटील यांच्या पत्नीसह मुलांनी हंबरडा फोडला. नातेवाईकांनी त्यांना खाली उतरून त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. मयत शिवाजी पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *