म.टा. प्रतिनिधी, नागपूर: प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून जुन्या प्रेयसीची हत्या करणाऱ्याला सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम. कणकदंडे यांनी जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. रोहित मनोहर हेमनानी उर्फ भोलानी (वय २५, रा. खामला) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना १ जुलै २०१८ रोजी घडली होती.
या प्रकरणातील मृत मुलगी रुपाली (नाव बदलेले) ही लक्ष्मीनगर येथे मामाच्या घरी राहत होती. ती प्रतापनगरातील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. या दोघांचे प्रेमसंबंध होते. पुढे त्यांच्यात वाद झाल्याने ब्रेकअप झाले. मात्र, ही बाब आरोपी रोहितला मान्य नव्हती. त्याने मुलीला आपल्याशी प्रेमसंबंध कायम ठेवण्यासाठी बळजबरी केली. परिणामी आरोपी चिडून तिला शिवीगाळ आणि धमक्यादेखील देऊ लागला होता. अखेर, त्याच्या या स्वभावाला कंटाळून तरुणीने रोहितशी संपर्कही तोडला.

तरुणीच्या वाढदिवशी शिक्षा
तरुणी लक्ष्मीनगरस्थित मामाकडे वास्तव्यास होती. आरोपी रोहित घटनेच्या दिवशी तरुणीच्या मामाकडे तरुणीला भेटण्यासाठी गेला. तरुणीच्या मामीला त्याने दोन ते तीन मिनीटे भेटू देण्याची विनंती केली. मात्र, मामीने नकार दिला. त्यानंतर, इमारतीमध्येच असणाऱ्या मामाच्या कार्यालयात रोहित गेला आणि त्याने मालाला गयावया केली. त्यानंतर मामीदेखील खाली आली. रोहितची ही शेवटची भेट म्हणून दोघांनी परवानगी दिली आणि तरुणीला खाली कार्यालयासमोर बोलावले. कट्यारीसह तयारीत आलेल्या रोहितने बोलणे झाल्यावर परतणाऱ्या तरुणीचा हात पकडला अन् भररस्त्यात खून केला. जिल्हा आणि सत्र न्यायालयाने तरुणीच्या वाढदिवशीच रोहितला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
Read Latest Maharashtra News And Marathi News