• Sat. Sep 21st, 2024

Nagpur Explosion: स्फोट की घातपात? ATS अ‍ॅक्शनमोडवर, गेल्या दोन दिवसांतील सर्व हालचाली तपासणार

Nagpur Explosion: स्फोट की घातपात? ATS अ‍ॅक्शनमोडवर, गेल्या दोन दिवसांतील सर्व हालचाली तपासणार

नागपूर: कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोलर ग्रुपच्या इकॉनॉमिक एक्स्प्लोझिव्ह लिमिटेडच्या युनिटमध्ये झालेल्या स्फोटामागे घातपात आहे का, या दिशेनेही दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) व गुप्तचर यंत्रणांनी तपास सुरू केला आहे.

-रविवारी सकाळी स्फोटाची माहिती मिळताच ही पथके बाजारगाव येथे पोहोचली. एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्फोट झालेल्या युनिटच्या बाह्य सुरक्षा व्यवस्थेसह त्यालगतच्या सुमारे तीन किमी चौरस किलोमीटर असलेल्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.

-ही यंत्रणा भेदून कोणी आत गेले का, यासह संपूर्ण परिसराची एटीएसच्या पथकाने सुमारे चार तास कसून तपासणीही केली.

-स्फोटात मृत्यमुखी पडलेले नऊ श्रमिक व त्यांच्या नातेवाइकांबाबतही सखोल माहिती घेण्यात आली आहे.

-गेल्या दोन दिवसांत कंपनीत कोण कोण अधिकारी, श्रमिक व अन्य व्यक्ती आले, कोणत्या वेळी आले, किती वेळ थांबले, ते कंपनीच्या बाहेर किती वेळ फिरले, त्यांची नावे व पत्तेही एसटीएसने घेतले आहेत.

-याशिवाय, एसटीएसच्या पथकाने घटनेपूर्वीच्या चार तासांच्या सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी केली.

-सोलरचा विस्तार दोन हजार एकरवर आहे. स्फोट झालेल्या युनिटला तारेचे कुंपण आहे. संरक्षण उत्पादनांचे कंत्राट या कंपनीला मिळाले आहे.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

-मोठ्या प्रमाणात कंपनीत उत्पादन होत असल्याने त्यांचा पुरवठा रोखण्यासाठी हा स्फोट करण्यात आल्याचा संशयही व्यक्त होत आहे. त्यामुळेच गुप्तचर यंत्रणांसह लष्काराने या स्फोटाची गांभीर्याने दखल घेतली आहे.

-सोलर कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यात आली आहे. मात्र, नेमके काय केले याबाबत विस्तृत माहिती देणे योग्य नसल्याचे खास सूत्रांनी स्पष्ट केले.

जानेवारीत झाला सायबर हल्ला

जानेवारीत ब्लॅक कॅट व अल्फा फाइव्ह नावाच्या सायबर गुन्हेगारांनी सोलर इंडस्ट्रिज लिमिटेडच्या संकेतस्थळावर सायबर हल्ला केला होता. संरक्षण क्षेत्राशी निगडित असलेल्या कंपनीवर सायबर हल्ला झाल्याने याप्रकरणाची दखल सीबीआयने घेतली. एप्रिल महिन्यात सीबीआयच्या पथकाने या प्रकरणाची माहिती घेतली होती. सायबर हल्ल्याचा रविवारी झालेल्या स्फोटाशी काही संबंध आहे का, या दिशेनेही तपास होत आहे.

संसदेतील घुसखोरीच्या घटनेचे धागेदोरे कल्याणपर्यंत पोहोचले, धुराच्या नळकांड्यांबाबत मोठी बातमी
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed