• Tue. Nov 26th, 2024
    ‘आंतरवाली ते मुंबई’, मनोज जरांगे पाटील यांच्या धगधगत्या आंदोलनावर पुस्तक

    सोलापूर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचे सुरू असलेल्या आंदोलनावरील पुस्तक प्रकाशित झाले आहे. प्रताप नलावडे लिखित ‘आंतरवाली ते मुंबई’ हे पहिले पुस्तक बार्शीतून प्रकाशित झाले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी उभा केलेल्या आंदोलनावर आंतरवाली सराटी पुढील पिढीला वाचण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी लिखित स्वरूपात कोणताच पुरावा नाही. त्यामुळे किमान या आंदोलनाची माहिती पुढील पिढीसाठी लिखित स्वरूपात असावी या उद्देशाने हे पुस्तक आधारित आहे.

    मनोज जरांगे पाटील यांची रोखठोक शैली पुस्तकातून मांडली

    बार्शीमधील ज्येष्ठ पत्रकार प्रताप नलावडे यांनी हे पुस्तक लिहिले आहे. त्यांनी आंतरवाली सराटीतून सुरू झालेल्या आंदोलनाची सविस्तर कहाणी या पुस्तकात मांडली आहे. नलावडे यांनी औसा सभेच्यावेळी हे पुस्तक जरांगे-पाटील यांना भेट दिले. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, असं नलावडेंनी सांगितलं. मनोज जरांगे-पाटील यांच्या एकूणच वीस वर्षांच्या आंदोलनाचा आढावाही यामध्ये घेण्यात आला आहे. त्यांच्या रोखठोक शैलीतील भाषणांचा वृत्तांत या पुस्तकात मांडण्यात आला आहे.

    मराठा आरक्षणप्रश्नी मुदतीवर अडून राहू नका, आणखी वेळ द्या, शिष्टमंडळाच्या विनंतीवर जरांगे म्हणाले…
    पुढील पिढीला मराठा आंदोलनाची माहिती व्हावी म्हणून पुस्तक प्रकाशित

    मराठा आरक्षणाची आवश्यकता, आरक्षणासाठी आजवर दिलेले लढे, कायदेशीर लढा देणारे विनोद पाटील यांची कहाणी आणि मराठा अभ्यासकांनी आरक्षणाची केलेली मांडणीही या पुस्तकात आहे. यापूर्वीही मराठा समाजाने शांततेत ५८ मोर्चे काढले. मात्र, पुढील पिढीला वाचण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी लिखित स्वरूपात कोणताच पुरावा नाही. त्यामुळे किमान या आंदोलनाची माहिती पुढील पिढीसाठी लिखित स्वरूपात असावी या उद्देशाने हे पुस्तक लिहिण्यात आलं आहे.

    मराठा आरक्षणाच्या अल्टिमेटमवर काथ्याकूट; सरकारचे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला, बैठकीत काय चर्चा झाली?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed