• Thu. Nov 28th, 2024
    अमोल कोल्हेंची अजित पवार गटावर जोरदार टीका; म्हणाले- डरकाळी फोडणारे कधी दिल्लीला प्रश्न विचारणार नाहीत

    रायगड: शरद पवारांनी काय केलं असा जेव्हा प्रश्न विचारला जातो त्या वेळेला समोर प्रश्न विचारण्याच्या आधी कानाखाली जाळ काढावासा वाटतो. विचारावं असं वाटतं की काय काय नाही केलं ते आधी सांग. मग ती सिडकोची निर्मिती असेल, माथाडी कायदा असेल, सातारा पाटण भागातील अनेक माथाडी कामगार येथे राहतात. माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पवार साहेबांनी केलेली धडपड असेल. हे सगळे या परिसराने पाहिला आहे, अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी विरोधकांना खडे बोल सुनावत शरद पवार यांच्या कामांच्या आठवणींना उजाळा करुन दिला.

    पनवेल येथे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात कोल्हे यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुनावत विरोधकांचा समाचार घेत लाचार अशी उपमा दिली आहे. अलीकडे कर्जत येथे झालेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या शिबिराचा उल्लेख करत अमोल कोल्हे यांनी समाचार घेत या शिबिराकडे रायगडाने सुद्धा डोळे वटारून पाहिलं की या शिबिरामध्ये नकली आयाळ लावलेले सिंह डरकाळ्या फोडत होते. तेव्हा त्या रायगडाने सुद्धा डोळे वटारुन पाहिलं. माझ्या अंगा खांद्यावर खेळलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलदेश्वरांसमोर स्वाभिमानाची डरकाळी फोडली होती. आज त्याच रायगडात येऊन दिल्लीसमोर लोटांगण घालणारी माणसे बोलतात, अशा शब्दात अमोल कोल्हे यांनी अजित दादांच्या राष्ट्रवादीचा समाचार घेतला आहे.
    मोदी सरकारने गरिबांचे जीवनमान सुधारले; पंतप्रधानांच्या निर्णयांबाबत अमित शहा यांचे वक्तव्यआता लोकच म्हणतात लग्न करताना पत्रिका पाहिली जाते तसं आता राजकारणाची पत्रिका बघितली पाहिजे. त्यामध्ये कुठे इन्कम टॅक्स सीबीआय असे ग्रह नाहीत ना. त्यामुळे इथून पुढे मतदान केंद्रावर बटन दाबताना पत्रिका पाहायला विसरू नका, असा जोरदार टोमणा खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला आहे. याच रायगडच्या भूमीने उभे जगाला दोन प्रसंगात स्वाभिमान शिकवला आहे. रायगडच्या भूमीने दाखवून दिलं की दिल्लीच्या तख्तासमोर झुकायचे नसते तर ताठ मानेने स्वाभिमानानं उभं राहायचं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर झालेला शिवराज्याभिषेक महाराजांनी स्वाभिमान निवडला आणि म्हणूनच साडेतीनशेवर्षानंतर नंतर महाराजांचं नाव घेतलं जातं, असं सांगत त्याने कार्यकर्त्यांमध्ये स्वाभिमानाचा अंगार फुलवण्याचा प्रयत्न केला.

    याच रायगडमध्ये दुसरी घटना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्यावर केलेला सत्याग्रह जिथे पुन्हा स्वाभिमान जागवला. जो मानवतेचा स्वाभिमान होता. जो मनुवादी प्रवृत्ती समोर झुकायचं नाही तर माणूस म्हणून ताठ मानेने उभं राहायचं याचाही आवर्जून उल्लेख कोल्हे यांनी केला. लाचारी करून जर का मान दुखावली तर नजरेला नजर मिळवून प्रश्न विचारता येत नाहीत. म्हणून फक्त पक्षांच्या शिबिरांमध्ये डरकाळी फोडणारे कधी दिल्ली श्वरांना प्रश्न विचारू शकत नाहीत. माझ्या कांद्याची निर्यात का बंद केली. माझ्या शेतकऱ्याला दुधाला भाव मिळाला पाहिजे. हे दिल्ली शहराला सांगू शकत नाहीत की माझ्या महाराष्ट्रातले उद्योगधंदे का पळवलेत अरे कुठला स्वाभिमान सांगतात आणि कुठले प्रश्न विचारत आहात. हा प्रश्न आता जनता विचारते आहे, अशा शब्दात अजितदादांच्या राष्ट्रवादीचाही त्यांनी समाचार घेतला आहे.

    देवेंद्र फडणवीस खोटं बोलतात, भास्कर जाधवांनी आश्वासनाचा पाढा वाचला

    उत्तरेकडे आयोध्याची चर्चा असली तरी महाराष्ट्राच्या मनात पंढरी आहे. कुणाच्या मुखात जय श्रीराम असलं तरी महाराष्ट्राच्या मनात राम कृष्ण हरी आहे. भगवंतांना पायरीच्या दगडाला भेटायला यावं. तुझं माझं एकच तुझं माझं काही नाही. अनेक वर्षांची उपेक्षा नाहीशी करावी तसा हा योग पवार साहेबांचे उपस्थितीने पनवेल येथे जुळून आला आहे, अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीचे कौतुक केले. स्वतःच्या आजारपणाची परवा न करता जो पक्ष २५ वर्ष जपला वाढवला आणि त्याच पवार साहेबांना निवडणूक आयोगाच्या सुनावणी येथे जाताना अनेकांनी पाहिलं. प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यात पाणी आलं अशाही भावना खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केल्या. ज्या नेत्यांने अख्खी ५५ वर्ष महाराष्ट्रासाठी चंदनासारखी झिजवली. त्याच पवार साहेबांवर आज ज्यांनी ही वेळ आणली त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. असंच प्रत्येकाने ठरवलं आहे. हाच निर्णय आपल्याला पनवेलकरांनो घ्यायचा आहे, अशी सादही अमोल कोल्हे यांनी घातली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed