• Mon. Nov 25th, 2024

    लिव्ह इन पार्टनरला त्रास; महिला कंटाळली, रागात कट रचला, तरुणाला घरी बोलवलं, नंतर जे घडलं त्यानं…

    लिव्ह इन पार्टनरला त्रास; महिला कंटाळली, रागात कट रचला, तरुणाला घरी बोलवलं, नंतर जे घडलं त्यानं…

    छत्रपती संभाजीनगर: ‘लिव्ह ईन’मध्ये पार्टनर असलेल्या युवकाने, महिलेला त्रास दिला. हा त्रास मिटविण्यासाठी युवकाला महिलेने राहत्या घरी बोलावून घेतले. या ठिकाणी सदर महिलेने तिच्या मुलासह मित्राच्या साह्याने मारहाण केली. मारहाण करून महिलेने युवकाला बेशुद्धावस्थेत शहराबाहेर गांधेली परिसरातील साई टेकडी परिसरात फेकून दिले. या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून २४ तासांच्या आत गुन्हे शाखा व एमआयडीसी सिडको पोलिसांनी संयुक्त कारवाई करून एकूण नऊ जणांना ताब्यात घेतले आहे.
    धक्कादायक! प्रेयसीला घरात डांबलं; नंतर अमानुष मारहाण अन्…, पुण्यात तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
    मिळालेल्या माहितीनुसार मृत युवकाचे नाव आनंद साहेबराव वाहूळ (वय २७, रा. कबीरनगर) असे आहे. या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात अंकुश साहेबराव वाहुळ (रा. कबीरनगर, उस्मानपुरा) यांनी तक्रार दिली आहे. अंकुश यांचा भाऊ आनंद वाहुळ हा जया विजय महापुरे (रा. दत्तनगर, चौधरी कॉलनी) हिच्यासोबत चार वर्षांपासून ‘लिव्ह ईन’मध्ये राहत आहे. जया हिने आनंद याला १३ डिसेंबर रोजी दुपारी १.३० च्या दरम्यान बोलावून घेतले. त्यानंतर जयाने आनंदला मारहाण केली आणि त्याला दुचाकीवर बसवून बाहेर नेऊन जखमी अवस्थेत गांधेली शिवारात साई टेकडी परिसरात नेऊन टाकले.

    याची माहिती त्याच भागात राहणाऱ्या आनंदच्या नातेवाइकाने अंकुश याला दिली. त्यानंतर उशिरापर्यंत आनंदशी संपर्क न झाल्याने अंकुश एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात पोहोचला. त्या वेळी जया महापुरे आणि त्याचा मुलगा तिथे होते. अंकुशने आनंदविषयी त्यांना विचारले असता त्यांना आनंदने मारहाण केली आणि तो मित्रांसोबत निघून गेला, असे त्यांनी सांगितले. जया महापुरे त्याच्या नातेवाईक असल्याने तिच्यावर विश्वास ठेवून अंकुश निघून गेले.

    कार्यकर्त्यांकडून लाडक्या नेत्याचं स्वागत, स्वाभिमान मेळाव्यासाठी शरद पवार नवी मुंबईत

    या प्रकरणी मारहाण करणाऱ्या जया महापुरे, तिचा मुलगा आणि अन्य तीन ते चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खुनाची घटना समोर आल्यानंतर हे सर्व जण कारमधून पळून जात होते. कारसह नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सचिन जाधव तपास करीत आहेत. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुरू केला. या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यू. एम. वैद्य यांच्या कोर्टात शनिवारी (१६ डिसेंबर) हजर करण्यात आले. कोर्टात हजर केल्यानंतर सरकारी वकीलांनी मारेकऱ्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. कोर्टाने या आरोपींना २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिल्याची माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांनी दिली.

    पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गौतम पातारे, सहायक पोलीस निरीक्षक विनायक शेळके, पोलीस उपनिरीक्षक विशाल बोडखे, आत्माराम घुगे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सतीश जाधव आदींच्या पथकाने मुख्य आरोपी जया राजू महापुरे, जया हिचा मुलगा, अन्य दोन विधिसंघर्षित बालके (रा. दत्तनगर, चौधरी कॉलनी, चिकलठाणा) यांच्यासह दादासाहेब संजय मिसाळ, अमित गुप्ता, आर्यन राठोड (सर्व रा. कामगार कॉलनी, चिकलठाणा), अभिषेक भंवर (रा. चौधरी कॉलनी), रोहित गायकवाड (रा. रोटेगाव स्टेशन, वैजापूर) या नऊ जणांना रोटेगाव रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेण्यात आले

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed