• Sun. Sep 22nd, 2024
बिझनेसमधील प्रतिस्पर्धी मित्राच्या मृत्यूसाठी जादूटोणा, व्हाट्सअपवर पाठवला धक्कादायक व्हिडिओ

दिगंबर माने, पुणे (हडपसर) : प्रतिस्पर्धी मित्राचा मृत्यू होण्याकरता स्मशान भूमीमध्ये जाऊन अघोरी पूजा करून, पूजेचा व्हिडिओ मित्राला पाठवून देण्याचा धक्कादायक प्रकार लोणी काळभोर हद्दीमध्ये घडला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोना प्रतिबंध कायदा अंतर्गत काळभोर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश तात्यासाहेब चौधरी ( रा. सो, ता.हवेली. जि. पुणे) याच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ३१ वर्षीय एका महिलेने फिर्याद दिली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर हद्दीतील अमोल मानमोडी व गणेश चौधरी हे दोघे मित्र सोरतापवाडी येथे प्लॉटिंग व्यावसाय करत होते. मात्र, मागील एक वर्षापासून व्यवसायात वाद झाल्याने त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता. त्यानंतर दोघांनीही प्लॉटिंगचे वेगवेगळे व्यवसाय सुरू केले.

बदलीसाठी अनोखी आयडिया! कागदोपत्री घटस्फोट घेतला पण संसार सुरळीत, तक्रार येताच शिक्षिका पोलिसांच्या रडारवर
व्यवसायात स्पर्धा होत असल्याने, त्यांच्यामध्ये नेहमीच किरकोळ वाद होत होते. गणेश चौधरी हा इतर मित्रांकडे ”अमोल मानमोडे याचे कधीही चांगलं होणार नाही, आणि मी चांगलं होऊ देणार नाही”, अशा धमक्या देत होता. प्लॉटिंग व्यवसायिक मित्रांचा एक व्हाट्सअपचा ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये गणेश चौधरी याने दि.२२ नोव्हेंबर २०२३ रोजी सोडतापवाडी स्मशानभूमी मध्ये चितेला अग्नी देण्याच्या ठिकाणी लिंबू कापून त्यामध्ये हळद कुंकू व इतर पूजेचे साहित्य मिसळून त्याद्वारे अघोरी पूजा केल्याचा व्हिडिओ ग्रुप मध्ये टाकण्यात आला.

या व्हिडिओ संदर्भात फिर्यादी महिलेने तपास केला असता अमोल मानमोडे यांचा ९० दिवसाच्या आत मध्ये मृत्यू घडावा व त्याचे प्रेत स्मशानातील ताटीमध्ये दिसावे या उद्देशाने अघोरी पूजा केल्याची माहिती समोर आली. त्यामुळे फिर्यादी अमोल मानमोडे पोलीस आयुक्तालय व अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे जिल्हा यांच्याकडे तक्रारी अर्ज केल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा लोणी काळभोर पोलीस ठाण्यात प्रतिस्पर्धी मित्राचा मृत्यू होण्याच्या उद्देशाने लिंबू कापून हळद कुंकू गुलाल याद्वारे अघोरी पूजा घालून जादूटोणा कृत्य केल्याची ऐका महिलेने गणेश चौधरी याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

आम्ही हार्दिकला कॅप्टन करतोय! MIनं रोहित शर्माला सांगितलं; अशी होती हिटमॅनची रिऍक्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed