• Sat. Sep 21st, 2024

मला धमक्यांचे मेसेज येत आहेत, कार्यक्रम करण्याची वक्तव्य केली जात आहेत, याचा अर्थ काय: भुजबळ

मला धमक्यांचे मेसेज येत आहेत, कार्यक्रम करण्याची वक्तव्य केली जात आहेत, याचा अर्थ काय: भुजबळ

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: ‘ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण द्या. यास कुणाचाही विरोध नाही. सर्वांची भूमिका हीच असताना मलाच का ‘टार्गेट’ केले जाते,’ असा सवाल अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर भुजबळांनी आक्षेप घेतले. राज्यातील झुंडशाही रोखण्याचे सरकारसह सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन केले.

मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावर चर्चा करताना भुजबळ यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगून ओबीसी व मराठा समाजाशी संबंधित महामंडळांना मिळणार निधी, नोकरीचे प्रमाण व इतर आकडेवारी सादर केली. ते म्हणाले, ‘सारथी’ला आठ ठिकाणी एक रुपया चौरस फूटप्रमाणे जागा मिळाली. महाज्योतीला २८ कोटी रुपये आधी भरण्यास सांगितले. व्यावसायिक अभ्यासक्रमातही असाच दुजाभाव केला गेला. महामंडळांचे भांडवल किती, याचाही विचार करावा. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे भांडवल एक हजार कोटी तर, इतर मागासवर्ग महामंडळाचे दीडशे कोटी रुपये आहे. वसंतराव नाईक महामंडळाचे शंभर कोटी रुपये आहे. कोणत्याही वंचित समाजाच्या कल्याणासाठी भेदभाव केला जाऊ नये. सरकारी नोकरीत आरक्षण २७ टक्के असताना पदे ९.५ टक्के भरली गेली. सरकारने हा अनुशेष दूर करावा. त्यासाठी सर्वांनी पाठपुरावा करावा. जातनिहाय गणनेची मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्वांची आहे. याचाही विचार करावा. कमी संख्या असल्यास कमी आरक्षण द्यावे.’

मुलाला सुखरुप पोहोचवा, नाहीतर आम्ही जीव सोडू; संसदेत घटलेल्या प्रकारावर अमोलच्या आई-बापाचा टाहो

विधान परिषदेतही चर्चा
‘मराठा समाजाला आरक्षण देण्यास कोणतीही हरकत नाही, असा ठराव संमत करून केंद्र सरकारकडे पाठवला असताना सरकारकडून त्यावर चर्चा कशासाठी घडवण्यात येत आहे? चर्चा करण्याऐवजी मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण देण्यात येणार आहे, याची माहिती सरकारने सभागृहात द्यावी,’ असा मुद्दा विरोधकांकडून मराठा आरक्षणावरील चर्चेदरम्यान उपस्थित करण्यात आला.

कोट
विविध माध्यमातून मला धमक्यांचे संदेश येत आहेत. ‘मी त्याचा कार्यक्रम करतो,’ अशी वक्तव्ये केली जात आहेत. याचा अर्थ काय? एक दिवस अचानक पोलिस बंदोबस्त वाढला. विचारणा केली असता, ‘तुम्हाला गोळी मारतील,’ अशी माहिती असल्याचे मला सांगण्यात आले. हरकत नाही. मरायला तयार आहे!

– छगन भुजबळ, राज्याचे मंत्री

मंत्रीपदाचा राजीनामा द्या, मग काय ते बोला; पृथ्वीराज चव्हाण भुजबळांवर संतापले

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed