• Sat. Sep 21st, 2024
विद्यार्थ्यांना नेणाऱ्या रिक्षाची भुयारी मार्गात डंपरला जोरदार धडक, पुण्यात भीषण अपघात

पुणे : पुण्यातील चांदणी चौकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शालेय वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षाने डंपरला धडक दिली. या अपघातात ऑटो रिक्षामधील सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे काही वेळ चांदणी चौकात वाहतुकीची कोंडी झाल्याचे देखील पाहायला मिळाले.

सार्थक सुभेदार आणि रिद्दी दाभाडे हे दोन विद्यार्थी यात जखमी झाले आहेत. तर सार्थक सुपेकर, चिन्मय आरोळेकर, राजवीर फुले, आकांक्षा भोसले हे विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. हे सर्व विद्यार्थी सात ते आठ वर्ष वयोगटातील आहेत. नामदेव काशिनाथ गोळे असे जखमी झालेल्या रिक्षा चालकाचं नाव आहे.

मुख्यमंत्री अध्यक्षांना उठसुठ बोलवायचे, मागासवर्ग आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांचा खळबळजनक खुलासा
चांदणी चौकात दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास शालेय वाहतूक करणारा ऑटो रिक्षा मुलांना शाळा सुटल्यानंतर मुलांना घेऊन मुंबई – बंगळूरु माहामार्गावरून जात होता. त्यावेळी भरधाव वेगात असलेली ऑटो रिक्षा भुयारी मार्गात डंपरला जाऊन धडकली. रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. या रिक्षातील सर्व मुले ही एमआयटी प्रि स्कूलचे विद्यार्थी होते. या अपघातातील तीन विद्यार्थ्यांना एशियन हॉस्पिटलमध्ये आणि अन्य दोन विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार करण्याचे काम सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत या विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल केले. याबाबत रिक्षा चालकाने सांगितले की, चांदणी चौकातून मी विद्यार्थ्यांना भू गावच्या दिशेने घरी सोडायला निघालेलो होतो. एका वळणावर आमची रिक्षा डाव्या बाजूला असलेल्या डंपरला जाऊन धडकली. यात मी आणि मुले जखमी झाली असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. अचानक झालेल्या या अपघाताने परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.

ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी आली सर्वात आनंदाची बातमी, मैदानात पुन्हा कधी दिसणार जाणून घ्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed