म. टा. वृत्तसेवा, अमरावती : महानुभाव तथा संत साहित्याचे गाढे अभ्यासक, लेखक, साहित्यिक प्रा. पुरुषोत्तम नागपुरे उपाख्य कारंजेकरबाबा (वय ९३) यांचे आज मंगळवारी निधन झाले. उद्या बुधवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
प्रा. नागपुरे यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील खडकी येथे ११ नोव्हेंबर १९३२ येथे झाला होता. त्यांचे वडील स्वातंत्र्यसंग्राम सेनानी होते. राज्याच्या शिक्षण विभागात ३५ वर्षे सेवा दिल्यानंतर १९९१मध्ये सेवानिवृत्त झाले. विविध साहित्य, संशोधन व ग्रंथाचे लेखन केले. जवळपास ३२ ग्रंथ त्यांनी लिहिले. यात प्रामुख्याने ‘लीळाचरित्र’चा समावेश आहे. श्री क्षेत्र रिद्धपूर येथे त्यांनी श्री प्रभू प्रबोधन संस्था स्थापन केली.

‘महानुभाव’ मासिक व ‘ओज’ या साप्ताहिकाचे संपादन करीत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे १२ वर्षे सिनेट सदस्य होते. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात महानुभाव साहित्य संशोधन केंद्राच्या स्थापनेत त्यांची मोठी भूमिका होती. अखिल भारतीय महानुभाव साहित्य सेवा मंडळाच्यावतीने देशातील विविध भागांत ११ साहित्य संमेलनांचे आयोजन त्यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे सम्मानपत्र, संशोधन साहित्यरत्न, जीवनगौरव अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. डॉ. पंजाबराव देशमुख लोक विद्यापीठाने त्यांना डी.लिट. ही मानद पदवी प्रदान केली होती.