• Mon. Nov 25th, 2024
    सुनील शुक्रे यांची राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवड

    नागपूर: राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांच्या राजीनाम्यावरून मंगळवारी विधानसभेत विरोधकांच्या गदारोळात घेरलेल्या राज्य सरकारने सायंकाळी उशिरा आयोगाची रिक्त पदे भरली आहेत. सुनील शुक्रे हे राज्य मागासवर्ग आयोगाचे नवे अध्यक्ष असतील. सरकारने मंगळवारी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
    मोठ्या पवारांना शुभेच्छा, छोट्या पवारांना आशीर्वाद मधले पवार चुकीच्या झाडाला लटकलेत, राऊतांची घणाघाती टीका
    राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी शासनाने छत्रपती संभाजीनगर येथील ओमप्रकाश जाधव यांची नियुक्ती केली आहे. तर पुण्याचे मारुती शिकारे आणि नाशिकचे मच्छिंद्रनाथ तांबे यांनाही राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य करण्यात आले आहे. यापूर्वी ४ डिसेंबर रोजी निरगुडे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तर राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य बालाजी किल्लारीकर, लक्ष्मण हाके आणि संजीव सोनवणे यांनी राजीनामा दिला होता.

    युवकांच्या प्रश्नांसाठी रोहित पवार आक्रमक, राड्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

    राज्य मागासवर्गीय आयोगाची राज्य सरकारकडून पुर्नरचना करण्यात आली आहे. यात आयोगाच्या अध्यक्षपदी सुनील शुक्रेंची नियुक्ती करण्यात आली आहे. निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्या राजीनाम्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed