• Thu. Nov 28th, 2024

    ट्रकची उसाच्या ट्रॉलीला धडक, दाम्पत्य ट्रॉलीच्या चाकाखाली, ऊसतोड मजूर जोडप्याचा दुर्दैवी अंत

    ट्रकची उसाच्या ट्रॉलीला धडक, दाम्पत्य ट्रॉलीच्या चाकाखाली, ऊसतोड मजूर जोडप्याचा दुर्दैवी अंत

    सातारा: पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर रायगाव फाट्यानजीक असणाऱ्या पेट्रोल पंपासमोर भुईंजकडे निघालेल्या उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात ऊसतोड मजूर दाम्पत्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर ट्रकमधील क्लीनर जखमी झाला.

    दरम्यान, कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारापासून काही अंतरावर चिमणगाव गोठा ते खिरखंडी रस्त्यावर ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने ऊस तोडणी मुकादम असणारे दोन सख्खे भाऊ ठार झाले होते. अपघातानंतर तब्बल दीड तास त्यांना उपचारासाठी वाहन न मिळाल्याने अखेर दोघांचाही मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच ऊसतोड कामगारांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

    याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – बंगळुरू आशियाई महामार्गावर रायगाव फाट्यानजीक असणाऱ्या तीव्र उतारावर उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर (क्रमांक एमएच १६ सीव्ही ४१५४) भुईंजकडे चालला होता. त्याचवेळी पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने ट्रक (क्रमांक एमएच १२ एसएफ ९८५५) ने पुढे चालणाऱ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. यावेळी त्या धडकेने ट्रॅक्टरवर चालकासह बसलेले ऊसतोड मजूर असलेले पती- पत्नी उसाच्या ट्रॉलीच्या दोन्ही चाकाखाली आले.

    बाईक थेट ट्रकच्या चाकात घुसली, लग्नाच्या वाढदिवसाच्या आठवडाभरातच तरुणाचा दुर्दैवी अंत
    त्यामध्ये असणारे पती चाकाखाली सापडून जागीच ठार झाले. तर, पत्नीदेखील चाकखाली सापडली होती, मात्र ती गंभीर जखमी झाली होती. जखमी महिलेस चाकाखालून बाहेर काढून उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र, तिचाही मृत्यू झाला. या दोघांचे ही मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. या दोघांची नावे समजू शकली नाहीत.

    यावेळी तात्काळ भुईंज पोलिस स्टेशनचे वाहतूक पोलिस एस. डी. धुमाळ यांनी तातडीने टोलवरील क्रेन बोलावले. टोल नाका इन्चार्ज अविनाश फरांदे, किरण सोनावणे, शुभम जेधे, पोलीस मित्र सुधीर गोरे यांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली.

    पती पत्नीनं बनावट स्क्रीनशॉटद्वारे तब्बल ४०० जणांना घातला गंडा, सापळा रचून पोलिसांनी केली अटक

    प्रसंगावधान राखून जखमी महिलेस चाकाखालून बाहेर काढून उपचारासाठी पाठविले, तर यावेळी ट्रकमध्ये असणारा क्लीनर देखील जखमी झाला होता. ट्रकच्या केबिनमध्ये असणाऱ्या क्लीनरला ओढून बाहेर काढावे लागले. त्यालाही उपचारासाठी जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले.

    हॉटेल रुममध्ये गेली, कपाट उघडलं, कपाटाच्या आत गुप्त दरवाजा, उघडताच महिलेला धडकी
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed