• Thu. Nov 28th, 2024
    क्रेटा कारचा पहाटेच्या सुमारास सिनेस्टाईल पाठलाग, गा़डीतून पकडला अवैध दारू साठा; किंमत तब्बल…

    रत्नागिरी: सोमवारी पहाटेच्या सुमारास मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिनेस्टाईल थरारक पाठलाग करून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्ग महामार्गावर हुंडाई क्रेटा या आलिशान कारमधून पळ काढणाऱ्या संशयित वाहनाचा सिनेस्टाईलने पाठलाग करत विदेशी दारू वाहतुकीसह संशयित आरोपींना पकडण्यात आले आहे. या कारवाईत एकूण १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
    राज्यात ६६१ खासगी शाळा अनधिकृत; गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू, दीपक केसरकर यांची माहिती
    मिळालेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून भरारी पथकाने गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाने पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केली आहे. मात्र यामुळे पुन्हा एकदा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची छुपी वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाला आहे. नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ११ डिसेंबर रोजी सोमवारी पहाटे रोजी गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरुन गस्त घालत असताना उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला खबऱ्याकडून माहिती मिळाली. गोवा राज्य बनावट विदेशी दारुची वाहतूक होणार असलेची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली.

    तातडीने या पथकाने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर एस.टी. स्टँड समोरील गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर थांबून वाहनांची तपासणी सुरू केली. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास गोव्याच्या दिशेने येणाऱ्या राखाडी रंगाच्या चारचाकी कारला थांबविण्याचा इशारा केला. मात्र पथकाला चुकवून या वाहन चालकाने न थांबता भरधाव वेगाने रिव्हर्स गिअर टाकून तेथून वाहनासह पळ काढला. संशयित आलिशान क्रेटा कार चालकाने आपल्या ताब्यातील ह्युंडाई कंपनीची क्रेटा या वाहनातून पळ काढला. मात्र भरारी पथकाने सिनेस्टाईलने पाठलाग करत ही कार अडवण्यात यश मिळवलं. कार चालकालाही जागीच पकडले. त्यामुळे भरारी पथकाला गुंगारा देऊन त्यांच्यासमोरच पळ काढणाऱ्या संशयित आरोपी इसमांना पकडण्यात आले. या वाहन चालकाच्या ताब्यातील वाहनामध्ये गोवा बनावटी विदेशी मद्याचे विविध ब्रॅण्डचे एकूण ४ लाख ६५ हजार १२० रुपये किंमतीचे ८१ बॉक्स मिळून आले.

    कुटुंबियांना लाकडी घाण्याचं तेल मिळणं कठीण गेलं, तरुणीनं स्वतःच व्यवसाय सुरु करून ब्रँड बनवला

    या मोठ्या कारवाईत आलिशान क्रेटा कारसहित एकूण १६ लाख ६५ हजार १२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी ओंकार इंद्रजीत सावंत आणि सहआरोपी वैभव मनोज कांबळी याच्यांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ मधील तरतूदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर आणि रत्नागिरी जिल्ह्याचे अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय दळवी, निरीक्षक सचिन यादव, निरीक्षक शैलेश कदम, जवान वैभव सोनावले, महिला जवान सुजल घुडे, जवान वाहनचालक मलिक धोत्रे यांनी कारवाईत सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक संजय दळवी, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी भरारी पथक करत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed