• Sat. Sep 21st, 2024

राष्ट्रीय सरपंच पुरस्कारात पुणे जिल्ह्याचा डंका! १४ सरपंचांचा सन्मान, शरद पवारांकडून शाबासकी

राष्ट्रीय सरपंच पुरस्कारात पुणे जिल्ह्याचा डंका! १४ सरपंचांचा सन्मान, शरद पवारांकडून शाबासकी

पुणे : विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ५० व्यक्तींचा दरवर्षी दिल्ली येथे पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यंदाच्या वर्षी या पुरस्कार सोहळ्यात पुणे जिल्ह्याची मान उंचावली आहे. यंदाच्या राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार २०२३ या पुरस्कारासाठी पुणे जिल्ह्यातील १४ सरपंचाना राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यात ८ महिला आणि ६ पुरुष सरपंचाचा समावेश आहे. या पुरस्काराने पुणे जिल्ह्याची मान देशात उंचावली आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी सरपंच सेवा महासंघाचे राज्याचे अध्यक्ष विकास शिवाजीराव कडू पाटील यांच्या पुढाकाराने हा पुरस्कार मिळाल्याचा भावना यावेळी सरपंचांनी व्यक्त केल्या आहेत.

दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडीया येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री विश्वेश्वर तुडू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन इंडिया यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात सातारा जिल्ह्यातील दोन सरपंचांना देखील हा पुरस्कार देण्यात आला आहे. मात्र दिल्लीत चर्चा मात्र पुण्याचीच होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः त्यांच्या निवासस्थानी बोलावून या सर्व सरपंचांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
नवाब मलिक कोणत्या गटात मला माहिती नाही, फडणवीसांच्या पत्रानंतर प्रश्नांच्या सरबत्तीने अजित पवार भडकले
पुरस्कार मिळालेल्या सरपंचांची नावे

  • विकास शिवाजीराव कडूपाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष, सरपंच सेवा फेडरेशन राज्य (निवि गेवांडे, सरपंच).
  • संजय चिंधू साठे, सरपंच, वाळेण, ता.मुळशी.
  • सुलभा कुंदन भोते- सरपंच, परंदवडी, ता. मावळ.
  • गणेश शिवाजी बोऱ्हाडे – सरपंच, साते, ता.मावळ.
  • प्राची कैलास लिंभोरे, सरपंच आसखेड, ता. खेड.
  • कोमल साईनाथ पाचपुते, सरपंच – वासुली, ता. खेड.
  • अमोल भाऊसाहेब लिमण, सरपंच- पारवडी, ता.भोर.
  • छाया मुकुंदराव सपकाळ- सरपंच- कुंबळे, ता.भोर,
  • संगिता प्रदीप शेवाळे – सरपंच-चिंचोडी लांडेवाडी, ता. आंबेगाव.
  • सोमनाथ रसिक भाकरे, सरपंच, माळवाडी, ता. शिरूर.
  • अर्चना मुकुंद महाळुंगकर- सरपंच-महाळुंगे इंगळे, ता. खेड.
  • प्रियांका अभिजित देवदरे, सरपंच, ता. खेड.
  • जयश्री योगेश राक्षे, सरपंच, मालवंडी ठुले, ता. मावळ.
  • रोहन सुनील जगताप, सरपंच सांगवडे, ता. मावळ.
  • रविराज मधुकर दुधगावकर सरपंच, शिरवळ, ता. खंडाळा.
  • मृणालिनी उमेश मोहिते सरपंच तळबीड, कराड.

मुलगी मित्राला भेटायला गेली, संतापलेल्या कुटुंबाने कास पठारावर नेऊन चोपले, साताऱ्यात ५ जणांवर गुन्हापुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील सरपंचांना त्यांच्या उत्कृष्ट काम केल्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच राज्यातील सर्व सरपंचांनी एकत्र येवुन विविध विकास कामे व नावीन्यपूर्ण योजना राबवाव्यात. सरपंचांच्या विविध अडीअडवणी दूर कराव्यात असे आवाहन कडू पाटील यांनी केले आहे. सरपंचांना दिल्ली येथे अवॉर्ड देवून सन्मानीत करण्यात आले. त्या सर्वांचे मी मनपुर्वक अभिनंदन करतो. अशा भावना विकास शिवाजीराव कडूपाटील यांनी व्यक्त केल्या आहेत. यावेळी कोळवडीचे सरपंच सागर चोरघे, लक्ष्मण राठोड, ज्योती मोहिते आदी यावेळी उपस्थित होते.

नवाब मलिक अजित पवार गटात, देवेंद्र फडणवीसांचा विरोध; पत्र दाखवत सक्षणा सलगर यांनी साधला निशाणा

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed