• Mon. Nov 25th, 2024
    कौतुकास्पद! तरुणांचा निश्चय अन् छोट्याश्या गावात उभारला ऑक्सिजन पार्क; हजार देशी वृक्षांचे रोपण

    सांगली: धकाधकीच्या आणि वाढत्या शहरीकरणाच्या जमान्यात माणसाला चांगले आरोग्य लाभणे कठीणच. त्यातच वृक्षांची कत्तल, वृक्ष लागवड होत नसल्याने वायू प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यासाठी सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील वसगडे गावच्या तरुणांनी पुढाकार घेऊन एक अभिनव कल्पना राबवली आहे. गावातच ऑक्सिजन पार्क तयार करून याठिकाणी २०० प्रकारच्या वृक्षांचे संवर्धन केले जात आहे.
    पादचारी दिनानिमित्त पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील वाहतुकीत बदल, असा असेल पर्यायी मार्ग
    निसर्गाच्या सानिध्यात राहून शुद्ध व स्वच्छ प्राणवायू कायमस्वरूपी मिळवण्याची अभिनव कल्पना पलूस तालुक्यातील वसगडे गावातील तरुणांनी मांडली. गावात त्या अनुषंगाने प्रबोधन केले. सारे जण एकत्रित आले आणि एकी में नेकी असेल तर काय घडते; याचा अनुभव यावा इतका सुंदर ऑक्सिजन पार्क गावात आकाराला आला. वसगडेतील निसर्ग संरक्षण संस्था आणि साताराच्या सह्याद्री देवराई सामाजिक संस्था यांच्या वतीने वसगडे गावात येरळा नदीच्या काठावर साधारण अडीच एकर क्षेत्रावर ऑक्सिजन पार्क उभारण्यात आला आहे. काट्या कुट्याच्या झाडांनी वेढलेल्या गायरानामध्ये स्वच्छता केली.

    देशद्रोहाचा आरोप करून मांडीला मांडी लावून कसे बसू शकता? अंबादास दानवेंचा प्रश्न; फडणवीसांचं प्रत्युत्तर

    जमिनीची लेवल करून मापे टाकून योग्य अंतरावरती वृक्ष लागवड केली. यामध्ये साधारण दोनशे प्रकारची एक हजारावर झाडांची लागवड केली आहे. त्यामध्ये परदेशी झाडांचा मोह टाळून सर्वच्या सर्व भारतीय कळातील देशी झाडे लावलेली आहे. या ऑक्सिजन पार्कमध्ये विविध सामाजिक, सहकारी संस्था, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक, विद्यार्थी या सर्वांचे सहकार्य लाभले. भविष्यात या परिसरात कृषी पर्यटन, नाना नानी पार्क, जॉगिंग पार्क, चिमुकल्यांसाठी उद्यान, तरुणांसाठी ओपन जिम उभारण्यात येणार असल्याची माहिती दीपक परीट यांनी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *