पुणे जिल्ह्यात २५ आणि २६ नोव्हेंबरला अवकाळी पाऊस झाला. त्यावेळी गारपिटीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत.
अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो, कांदा, तसेच भात, ज्वारी, बटाटा, मका, भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले. राज्य सरकारच्या आदेशानुसार, जिल्हा प्रशासनाने महसूल आणि कृषी विभागाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. हे पंचनामे आता पूर्ण झाले आहे. ११ तालुक्यातील सात हजार ८६३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, असा अहवाल जिल्हा कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिला आहे. त्यानुसार अवकाळी पावसामुळे ४३३ गावांमधील १९ हजार ७२७ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यात २५ व २६ नोव्हेंबर रोजी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे द्राक्ष, कांदा, टोमॅटो, डाळिंब यासारख्या फळपिकांसह भात, कांदा, ज्वारी, बटाटा, मका, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर राज्य सरकारच्या सुचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी महसूल व कृषी विभागाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. हे पंचमाने आता पूर्ण झाले असून ११ तालुक्यांतील ७ हजार ८३६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी देशमुख यांच्याकडे दिला आहे. त्यानुसार या अवकाळी पावसामुळे ४३३ गावांमधील १९ हजार ७२७ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.
जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले, ‘राज्य सरकारने ठरविलेल्या निकषांनुसार, जिरायती पिकांना प्रति हेक्टरी एक हजार, बागायती पिकांना दोन हजार तर फळपिकांना प्रति हेक्टरी अडीच हजार रुपयांची मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातीळ १९ हजार शेतकऱ्यांना ११ कोटी ३८ लाख ७७ हजारांची मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कृषी आयुक्तांमार्फत हा अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. या अहवालानुसार ३ हजार ३३२.५३ हेक्टरवरील जिरायती पिकांचे, २ हजार ९८४.४५ हेक्टरवरील बागायती पिकांचे, एक हजार ५४७.११ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यातून समोर आले आहे. अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे महसूल तसेच कृषी विभागाने पूर्ण केले आहे. हा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत सरकारला पाठविण्यात येणार आहे.
तालुका ………..क्षेत्र (हेक्टर)……….. नुकसानीची रक्कम
भोर………… ६५.७२…………….५,५८,६२०
मुळशी …………..१४१.०३…………..११,९८,७५५
मावळ …………..१३६…………११,५६,०००
हवेली…………….. ७८.३७………….६,७२,१७०
वेल्हा …………….४२.२५………….३,५९,१२५
आंबेगाव………….. ३१६०.५१…………४,०७,७९,४२५
जुन्नर ………………१०५८.५१………….. १,७०,६४,७०५
शिरूर …………………२२७१.६५…………… ३,५२,११,५२५
खेड …………………….. ३२७.२८……………..३८,३७,४२५
बारामती …………………… ५०१.१०………… १,१२,०९,८५०
इंदापूर ……………………..८१.२९…………. १८,२९,०२५
एकूण ……………………..७८३७…………..११,३८,७६,६२५