• Fri. Nov 15th, 2024
    मोठी बातमी: दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरेंची एसआयटीमार्फत चौकशी होणार?

    मुंबई: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असतानाच आता आदित्य ठाकरे यांची दिशा सालियन मृत्यूप्रकरणात विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळपर्यंत राज्य सरकारकडून विशेष तपास पथकाबाबत घोषणा केली जाऊ शकते. याप्रकरणात भाजपचे नेते पूर्वीपासूनच आदित्य ठाकरे आणि त्यांच्या काही निकटवर्तीयांवर आरोप करत आले आहेत. नारायण राणे आणि नितेश राणे यांनी दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आता एसआयटीकडून याप्रकरणी आदित्य ठाकरे यांची चौकशी केली जाऊ शकते, असा सूत्रांचा अंदाज आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्त्वाखाली ही एसआयटी टीम दिशा सालियन मृत्यूप्रकरणाच तपास करेल. एसआयटीने आदित्य ठाकरे यांना चौकशीला पाचारण केल्यास ठाकरे गटातून काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहावे लागेल. मात्र, एसआयटीने आदित्य ठाकरे यांची चौकशी केल्यास हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाची कोंडी होण्याची शक्यता आहे.

    Nitesh Rane: दिशा सालियन प्रकरणात राहुल कनालचं कनेक्शन? नितेश राणे म्हणाले, मोबाईल लोकेशन तपासलं तर…..

    राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी SIT चौकशीचे आदेश दिले होते. दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी नेमके आदित्य ठाकरे त्यावेळी होते कुठे ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. भाजप नेत्यांमध्ये नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याकडून दिशा सालियन प्रकरणात आदित्य यांच्यावर सतत आरोप केले जातात. मध्यंतरी दिशा सालियन हिच्या पालकांनी राणे पिता-पुत्रांविरोधात बदनामीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नारायण राणे यांना चौकशीसाठी मालवणी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते.

    सुशांत-दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या माजी सहकाऱ्याचा मोठा दावा; म्हणाले….

    मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोन आला होता: नारायण राणे

    नारायण राणे यांनी दिशा सालियन मृत्यूप्रकरणी अनेक पत्रकारपरिषदा घेऊन आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दिशा सालियनची हत्या ८ जूनला आणि सुशांतची हत्या १३ जूनला हत्या झाली. आमच्या वक्तव्यानंतर मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता. मंत्र्याची गाडी होती असे बोलू नका. तुम्हाला पण मुले आहेत. तुम्ही असे काय करू नका. हे मी माझ्या जबाबात सांगितले मात्र हे वाक्य वगळले जबाबातून वगळण्यात आले आहे. दिशा सालियनचे प्रकरणाची फाईल बंद करण्यात येत असून हे सरकार गुन्हेगारांना संरक्षण देत आहे, असा आरोपही राणे यांनी केला होता.

    दिशा सालियन प्रकरणात तक्रारदाराला ५० कोटींची ऑफर दिली; नितेश राणेंचा दावा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed