• Wed. Aug 19th, 2026
Video: आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी पुण्यातील फेमस सराफावार वार, चपलेवरुन आरोपीचा शोध

पुणे : पुण्यातील उच्चभ्रू असलेल्या लष्कर परिसरातील मेहता ज्वेलर्सचे मालक विजय मेहता यांच्यावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या आरोपीला सोशियल मीडियाच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या मदतीने अटक करण्यात आली आहे. वार करणारा आरोपी घटनास्थळी आपली एका पायातील चप्पल सोडून गेला होता. त्यानुसार तपास करत आरोपीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आरोपीने सारखी चप्पल घातल्याचा एक फोटो अपलोड केला. या तपासाच्या अनुषंगाने आरोपीला ताब्यात घेण्यात आला होतं. चौकशीदरम्यान त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.

युवराज घोरखे असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराजची आई मेहता यांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करायची. काही दिवसांपूर्वी मेहता यांच्या घरी चोरी झाली होती. तेव्हा मेहता यांनी त्याच्या आईवर चोरीचा संशय घेत पोलीस स्टेशनला नेले होते. त्याच रागातून हा धक्कादायक प्रकार युवराजने केला.
राजस्थान ते छत्तीसगड, मुख्यमंत्रिपदी अनपेक्षित चेहरे? मोदी-शहा २०१७ चा फॉर्म्युला वापरणार
२ डिसेंबरच्या रात्रीच्या ९.१५च्या सुमारास फिर्यादीचा भाऊ विजय विमालचंद मेहता हे आपले सराफाचे दुकान बंद करून घरी जात असताना, त्यांच्यावर अज्ञात इसमाने कोयत्याने वार करत भर चौकात हत्या करण्याच्या उद्देशाने त्यांचा पाठलाग केला. मात्र, मेहता यांनी आपला जीव मुठीत घेऊन तिथून पळ काढला. याबाबत विजय यांचा भाऊ मनोज विमलचंद मेहता यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलीस उपाआयुक्त समर्थना पाटील यांनी ही कारवाई केली आहे.

लज्जास्पद! महाराष्ट्र गुन्हेगारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर तर बाल अत्याचारांमध्ये मिळवला….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed