• Wed. Aug 19th, 2026

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: ‘देवेंद्रजी हे नागपूरचे आणि महाराष्ट्राचे सेवक आहेत. त्यांना येथेच काम करू द्या. महाराष्ट्राची सेवा करू द्या. त्यांना केंद्रात का पाठवताय?’ असा सवाल करीत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठविण्याच्या चर्चांवर सूचक प्रतिक्रिया दिली. व्हीएनआयटीमध्ये आयोजित ‘मंथन फॉर युवा’ कार्यक्रमानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.

यावेळी त्यांनी वंदे मातरम्, जेन-झी आंदोलन, धर्मस्वातंत्र्य कायदा, बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, तसेच पुणे आणि गडचिरोलीतील घटनांवरही आपली भूमिका मांडली. अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांनी दिव्या देशमुखच्या कामगिरीचे कौतुक केले. अशा खेळाडूंच्या पाठीशी समाजाने उभे राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

Amruta Fadnavis: जेनझीवर टीका करण्यापेक्षा त्यांना योग्य दिशा आणि सुविधा देण्याची गरज; अमृता फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेतकाँग्रेसवर टीका

वंदे मातरम् गायनावरून सुरू असलेल्या वादावर बोलताना अमृता फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली. ‘काँग्रेस स्वतःचे संविधान तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे’, असा आरोप त्यांनी केला.

युवकांचा सहभाग महत्त्वाचा

‘मंथन फॉर युवा’ उपक्रमाचे कौतुक करताना अमृता फडणवीस म्हणाल्या, हॅकथॉन, आयडियाथॉन, प्रदर्शन आणि स्टार्टअपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना समाजासमोर मांडल्या आहेत. यातील अनेक प्रकल्प लोकउपयोगी ठरू शकतात. ‘मेक इन इंडिया’ यशस्वी करण्यासाठी जेन-झीचा सहभाग महत्त्वाचा आहे. युवकांना शिक्षण, रोजगार आणि स्टार्टअपसाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

Maharashtra TimesNitin Gadkari: लोक दोन्ही बाजूंनी तबला वाजवतात; मीडिया आणि इन्फ्लुएन्सर्सवर गडकरींची टिप्पणी, टीकेवर काय म्हणाले?राज्याचे अढळस्थान

गुंतवणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये भारत आणि जगाच्या जोडणीसाठी महाराष्ट्र हे प्रवेशद्वार आहे. भविष्यातील विविध क्षेत्रांतील गरजा लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन आणि विकास, डेटा सेंटर यासोबत पायाभूत सुविधांची परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी गुंतवणूकदारांचे महाराष्ट्र हे यशस्वी ठिकाण असून, राज्याचे स्थान अढळ आहे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले. ‘इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स’च्या हॉटेल ललित येथे आयोजित राष्ट्रीय परिषद २०२६ मध्ये मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी भारतातील अमेरिकेचे राजदूत जॉर्जिस गोर, उत्तर प्रदेशाचे राज्यमंत्री दिनेश प्रताप सिंह, इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स राष्ट्रीय अध्यक्ष अनुप आचार्य, कार्यकारी उपाध्यक्ष प्रशांत कृष्णन, उपासना अरोरा, अवनीश अवस्थी आदी मंचावर उपस्थित होते.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed