• Wed. Aug 19th, 2026

ठेकेदार उपाशी, सरकार तुपाशी; ८६ हजार कोटींचे बिल थकीत, शासकीय कंत्राटदार आक्रमक!

ByMH LIVE NEWS

Aug 19, 2026 #mt

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राज्यातील शासकीय कंत्राटदारांचे ८६ हजार कोटी देयके प्रलंबित आहेत. थकीत बिलं मिळण्यासाठी कंत्राटदारांनी मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू केलेय. केलेल्या कामाचे पैसे मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. निवडणुका जिंकण्यासाठी खोटेपणा केला, अशी टीका आंदोलक कंत्राटदार करत आहेत. अशा प्रकारे सत्ता चालवल्यास समाजाची वाट लागेल, असा संताप ठेकेदारांनी व्यक्त केला. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कंत्राटदार बळी ठरत आहेत, असे त्यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed