• Wed. Aug 19th, 2026

Nagpur Crime News : तरुण-तरुणीने हॉटेलमध्ये रुम बुक केली होती. रात्री साडेनऊच्या सुमारास किंकाळ्या ऐकू आल्या. नागपूरच्या स्टेरिअस हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? तरुणाच्या चौकशीतून काय माहिती समोर येणार?

नागपूर हॉटेल रुम ३०२ तरुणीची हत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जितेंद्र खापरे, नागपूर : नागपुरातील मनीषनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये तरुणीची हत्या करून युवकानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना काल मंगळवारी रात्री समोर आली. हॉटेलच्या रूम क्रमांक 302 मध्ये 28 वर्षीय शिवानी राजानंद गजभिये आणि किरण संजय आत्राम हे दोघे रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. शिवानीच्या शरीरावर चाकूचे अनेक वार करण्यात आल्यानं तिचा मृत्यू झाला, तर किरण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मनीषनगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी आणि किरण हे काल मंगळवारी मनीषनगरातील अजित बेकरीमागील एका हॉटेलमध्ये आले होते. दोघांनी हॉटेलमधील रूम क्रमांक 302 भाड्याने घेतली. काही वेळ दोघे रूममध्ये होते. मात्र, रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक रूममधून मोठ्या आवाजात किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. त्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांसह शेजारील रूममधील व्यक्तींनी तातडीने रूमकडे धाव घेतली. रूममध्ये प्रवेश केल्यानंतर समोरचं दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. शिवानी रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली होती, तर तिच्या शेजारी किरणही गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. रूममध्येच रक्तानं माखलेला चाकू आढळून आला. शिवानीच्या शरीरावर चाकूचे अनेक घाव होते. हॉटेल व्यवस्थापनाने तातडीने बेलतरोडी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

Maharashtra TimesRiddhi Thakkar : ब्रेकचा इश्यू, तरी मुंबईकर रिद्धीने हट्टाने ‘अव्हेन्जर’ चालवली, बाईक रॅली आयोजकांचा दावा, ब्लाईंड स्पॉटवर ट्रकने चिरडलं

दोघेही रेल्वे कर्मचारी

माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी दोघांनाही तातडीनं रुग्णालयात हलवलं. मात्र, डॉक्टरांनी शिवानीला मृत घोषित केले. किरणवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून तो गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतक शिवानी राजानंद गजभिये (वय 28 ) ही अजनीतील शताब्दी चौक परिसरात राहत होती. तर जखमी किरण संजय आत्राम हा अजनीतील रेल्वे वसाहतीत राहत असल्याचं सांगण्यात येत आहे. दोघेही रेल्वे कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

घटनेमध्ये वेगवेगळे पैलू

दरम्यान, दोघांमध्ये लग्नाच्या मुद्द्यावरून वाद झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. हा वाद मिटवण्यासाठी किंवा काहीवेळ एकत्र घालवण्यासाठी दोघे हॉटेलमध्ये आले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, रूममध्ये नेमकं काय घडलं? याचा तपास अद्याप सुरू आहे. पोलिसांच्या प्राथमिक संशयानुसार, रूममध्ये दोघांमध्ये वाद झाला असावा. वाद विकोपाला गेल्यानंतर किरणने शिवानीवर चाकूने अनेक वार केले असावेत. त्यानंतर त्याने स्वतःलाही चाकूने जखमी करून आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. किरणने चाकू सोबत आणला होता का? याचाही तपास सुरू असून हल्ला पूर्वनियोजित होता का, हा प्रश्नही पोलिसांसमोर आहे.

Maharashtra TimesPune Crime : पुण्यात नसरापूरची पुनरावृत्ती! 9 वर्षीय मुलीवर अत्याचार, नंतर जीव घेऊन बॉडी फेकली, आमदार शरद सोनवणेंच्या गावातच संतापजनक कृत्य

गळ्यात मंगळसूत्र, बेडवर गुलाबाच्या पाकळ्या आणि फुगे

घटनास्थळी शिवानीच्या गळ्यात मंगळसूत्र असल्याचं दिसून आलं. तिच्या भांगातही रक्त आढळलं. किरणने स्वतःला जखमी केल्यानंतर तिच्या भांगात कुंकवाऐवजी स्वतःचं रक्त लावलं असावं, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही. हॉटेलच्या रूममध्ये बेड गुलाबाच्या पाकळ्या आणि फुग्यांनी सजवण्यात आला होता. त्यामुळे दोघे नेमक्या कोणत्या कारणासाठी हॉटेलमध्ये आले होते? याचाही तपास केला जात आहे. काही वेळापूर्वी रूममध्ये असलेलं वातावरण आणि त्यानंतर घडलेला रक्तरंजित प्रकार यामुळे या घटनेचं गूढ अधिक वाढलं आहे.

बेलतरोडी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून चाकूसह इतर पुरावे ताब्यात घेतले आहेत. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. दोघांमधील संबंध, लग्नाचा मुद्दा, घटनेपूर्वी झालेला वाद आणि किरणने केलेला हल्ला पूर्वनियोजित होता का? याचा तपास पोलीस करत आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा