यवतमाळ: एका गतिमंद महिलेला मारहाण करत तिच्यावर एका अनोळखी तरूणाने अत्याचार केला. ही घटना शहरातील आर्णी बायपास मार्गावर असलेल्या एका लॉन परिसरात दि. ३ डिसेंबरला सायंकाळच्या सुमारास घडली. शहरातील आर्णी मार्गावर एक गतिमंद महिला तिच्या नातेवाईकांसह राहत होती. रविवारी सायंकाळच्या सुमारास ती महिला शौचालयास आर्णी बायपास मार्गावर असलेल्या एका लॉन परिसरात मोकळ्या जागेत गेली होती.
त्यानंतर एका अनोळखी तरूणाने येऊन त्या महिलेला ओढत झुडूपामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने आरडाओरड केली असता तिला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. बऱ्याच वेळ होऊनही ती महिला घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. ती आर्णी बायपास मार्गावर असलेल्या लॉन परिसरात आढळून आली. यावेळी ती जखमी अवस्थेत आढळून आल्याने नातेवाईकांनी तिची विचारपूस केली असता घडलेला प्रकार तिने सांगितला.

दरम्यान तिला घरी सोडल्यानंतर नातेवाईकांनी त्या तरूणाचा शोध घेतला. यावेळी एक तरूण त्या ठिकाणी आढळून आल्याने त्याचा पाठलाग करण्यात आला. मात्र तो पसार होण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी सोमवार, ४ डिसेंबरला अवधुतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून वृत्त लिहीपर्यंत गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू होती. सध्या त्या पिडीत महिलेवर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे.