• Tue. Nov 26th, 2024
    सिग्नल सुरु करायला ५ मिनिट उशीर,जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केली दोन महिला पोलिसांची तडकाफडकी बदली

    Chandrapur News: चंद्रपूर शहरातील कस्तुरबा चौकात सिग्नल वेळात सुरू न केल्याबद्दल पोलिस अधीक्षकांनी दोन महिला वाहतूक पोलिसांची तडकाफडकी बदली केली आहे. या बदलीची संपूर्ण शहरात चर्चा सुरू आहे.

    Lipi

    चंद्रपूर (निलेश झाडे): सिग्नल सुरु करायला पाच मिनिट उशीर झाल्याने पोलिस अधीक्षकांनी दोन महिला वाहतूक पोलिसांची तडकाफडकी बदली केल्याचा प्रकार समोर आला आहे. उशीर होण्याचे कारण न विचारताच पोलीस अधीक्षकानी कार्यवाही केल्याने खळबळ माजली आहे. वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्यावर कार्यवाहीचा बडगा उचलला जाणार काय? याकडे लक्ष लागले आहे.

    चंद्रपूर शहरातील कस्तुरबा चौक मधील सिग्नल वेळेवर सुरू करण्याची जबाबदारी दोन महिला कर्मचाऱ्यावर होती. या दोन्ही महिला पाच मिनिट उशिरा पोहचल्या. याच दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन कस्तुरबा चौकातून गेले. त्यांना वाहतूक सिग्नल बंद असल्याचे दिसले. यावर त्यांनी महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावित त्यांचं काही न एकता त्यांच्यावर कार्यवाही केली. खरंतर किमान वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांना किमान याबद्दल विचारणा करायला हवी होती. त्या दोन महिला सह वाहतूक निरीक्षक ही तेवढेच दोषी आहे. वाहतूक निरीक्षकावर कुठलीच कारवाई न झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यवाहीवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहे.
    आता वेळ आली आहे, जशास तसं उत्तर देण्याची! हे फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे; अमित ठाकरे आक्रमक
    ‘ या ‘ समस्या कडेही लक्ष द्या…

    चंद्रपूर शहरातील वाहतूक शाखेचा कार्यालयापुढे खाजगी बसेसच्या भल्या मोठ्या रांगा उभ्या असतात. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या वाहनाकडे जाणीवपणे दुर्लक्षित केले जाते. दिव्याखाली अंधार असा हा प्रकार आहे. वाहतूक पोलीस अधीक्षकांनी डोळे बंद केले असले तरी शिस्त पाडणारे जिल्हा पोलीस अधीक्षक यावर कार्यवाही करतील काय ? अशी चर्चा आता शहरात सुरू आहे.
    सर्वांचे लक्ष महाराष्ट्रावर तिकडे बिहारमध्ये प्रशांत किशोर यांच्या पक्षाने केला मोठा गेम; NDAसह इंडिया आघाडीचे धाबे दणाणले

    उशीर झाला तर कार्यवाही, मारहाण झाली तर शांत

    काही महिन्यापूर्वी जटपुरा गेट परिसरात महिला पोलीस कर्तव्यावर असताना महिला पोलिसावर एका राजकीय पक्षातील पदाधिकारी महिलेने मारहाण केली होती, तसा प्रकार घडला होता . एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण झालेली असताना जिल्हा पोलीस अधीक्षकानी या गंभीर प्रकाराची दखल घेतली नसल्याची चर्चा पोलीस विभागातून पुढे आली होती.

    जयकृष्ण नायर

    लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed