• Sat. Sep 21st, 2024

आम्ही लोकसभेला ३४० जागा जिंकणार, ठाकरेंनी एक खासदार जिंकवून दाखवावा : गिरीश महाजन

आम्ही लोकसभेला ३४० जागा जिंकणार, ठाकरेंनी एक खासदार  जिंकवून दाखवावा : गिरीश महाजन

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : गेल्या लोकसभा निवडणूकीत शिवसेना उद्धव ठाकरे यांचे १८ खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यामुळे निवडून आले होते. यंदा लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी झालेल्या परीक्षेत भाजपाने मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान या तीन राज्यात चांगले यश मिळविले आहे. यामुळे आगामी लोकसभेतही भाजपा ३४० जागांवर विजयी मिळवेल, असा दावा राज्याचे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांनी केला. तसेच आगामी लोकसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने महाराष्ट्रात एक तरी खासदार निवडून आणून दाखवावा, असे आव्हान गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिले.

नुकत्याच झालेल्या पाच राज्याचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. या निकालात भाजपाने मध्यप्रदेशासह, राजस्थान आणि छत्तीसगढ मध्ये एकहाती सत्ता मिळविली. या निकालानंतर शहरातील भाजपाच्या कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. यावेळी महाजन यांनी सांगितले की, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ च्या नागरिकांनी देशाचे पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास दाखविला आहे. या राज्यातील जनतेने देशाचे पंतप्रधान मोदी यांच्यावर विकास कामांवर शिक्कामोर्तब केले आहे. या राज्यात मिळालेले यश हे चांगले असून मोठ्या अंतराने भाजपाने तीन राज्यात विजय मिळविला आहे. तेलंगणा राज्यात पक्षाची संघटना आणि या राज्यात भाजपाचे कामही नव्हतं. यामुळे तेलंगणातून काही मोठी अपेक्षा नव्हती. तरीही भाजपाने चांगली कामगिरी केली आहे. पुढच्या वेळी तेलंगणातही काम करून हे राज्यही भाजपामय करण्याचा प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

मोदी देश की गॅरेंटी राहुल गांधी पनौती

भाजपाच्या तीन राज्यातील विजयानंतर गिरीश महाजन यांनी राहुल गांधीवर टिका करून, या विजयाने देश की पनौती कोण आहे ? हे सिद्ध केले आहे. देशाची पनौती ही राहुल गांधी आहेत. तर देशाची गॅरेंटी ही नरेंद्र मोदी आहेत. असेही सांगितले. तसेच ईव्हीएमवर टिका केली जात असल्याबाबत बोलताना, गिरीश महाजन यांनी टीका करणाऱ्यांना नाचता येईना आंगण वाकडे अशा शब्दात उत्तर दिले.
ओवेसींना धक्का, भाजपने करिश्मा करुन दाखवला; तेलंगणात पराभव होऊनही भाजपला लॉटरी लागली

वाचाळविरांना मिळाले उत्तर

गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही चांगलीच टिका केली. त्यांना वाचाळवीर असे सांगत, महाराष्ट्र विधानसभा शिंदे गट, अजितपवार गट आणि भाजपा हे एकत्रित येऊन १०० टक्के विजय मिळविणार आहेत, असंही महाजन म्हणाले.
राजस्थानात सत्ताबदल, ट्रेंड मोडण्यात ‘जादूगार’ गेहलोतांना अपयश,काँग्रेसच्या पराभवाची ५ कारणं

मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी २४ डिसेंबर पर्यंत डेडलाईन दिली आहे. याबाबत विचारणा केली असता, गिरीश महाजन यांनी सांगितले कि, जरांगे पाटील यांनी सरसकट आरक्षण देण्याची मागणी केली आहे. ही मागणी शक्य नाही. कुणबी हे प्रमाणपत्र ज्याचं आहे. त्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहे. मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण देण्यासाठी, सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल करण्यात आली आहे. टिकाऊ आरक्षणासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

वसुंधरा राजे नव्हे तर ‘राजस्थानचे योगी’ होणार राज्याचे नवे मुख्यमंत्री? CM पदाच्या शर्यतीत कोण आहे आघाडीवर

ठाकरे गटावर बोलले, राऊतांवर निशाणा; नारायण राणेंचा दत्ता दळवींना सल्ला

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed