• Mon. Nov 25th, 2024

    कुठे ताकद-कुठे कमजोरी? मतदारसंघनिहाय पीपीटी सादर, दादांनी दावा ठोकताच पवारांचा शड्डू

    कुठे ताकद-कुठे कमजोरी? मतदारसंघनिहाय पीपीटी सादर, दादांनी दावा ठोकताच पवारांचा शड्डू

    पुणे : रायगडच्या कर्जत येथे अजित पवार यांच्या गटाचा एक मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये अजितदादांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह पवार गटावर जोरदार निशाणा साधला. त्यासोबतच महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४ जागांवर देखील दावा ठोकला आहे. त्यानंतर आज शरद पवार गट जोरदार तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे.

    आज पुण्यात निसर्ग मंगल कार्यालय येथे शरद पवार यांनी आपल्या प्रमुख आमदारांसह कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. या बैठकीत शरद पवारांसमोर लोकसभा मतदारसंघाचा पीपीटी सादर करण्यात आला आहे. कोणत्या मतदार संघात पक्षाची ताकद किती याचा आढावा देखील घेण्यात आला आहे.

    अजित पवारांनी लोकसभा मतदारसंघाची नावं सांगितली, जयंतराव शड्डू ठोकत म्हणाले ‘है तय्यार हम’!

    तर दुसरीकडे, मागच्या निवडणुकीत पडलेली पक्षाची मतं, संभाव्य उमेदवार, सद्याची स्थिती, आघाडीत लढलो तर कसा फायदा होईल हे मुद्दे या सादरीकरणात पवारांसमोर ठेवण्यात आले आहेत. प्रदेश कार्यालयाकडून लोकसभेसाठी तयार करण्यात आलेल्या अंतिम आराखड्याचे पवारांसमोर सादरीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, आजच्या बैठकीनंतर अंतिम जागांवर पक्षाचं एकमत होणार होणार असल्याची माहिती देखील खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी आकडेवारीनुसार आढावा घेतला आहे.

    कर्जतच्या विचार मंथन शिबिरात घरातील गोष्टी बाहेर, अजित पवारांचे काका शरद पवारांवर थेट आरोप

    अजित पवारांचा ४ जागांवर दावा

    कर्जत येथे झालेल्या शिबिरात अजित पवार यांनी बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या जागांवर आपला दावा ठोकला आहे. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी स्वतः शरद पवार यांनी बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed