• Sat. Sep 21st, 2024
समुद्रात खासगी बोटला भीषण आग, दोन खलाशी भाजले; जनरेटरमुळे आग लागली

वैभव भोळे, मुंबई (अलिबाग) : अलिबाग मांडवा जेट्टी जवळ उभ्या असलेल्या एका खाजगी स्पीड बोटला आज शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत बोटीवरील २ खलाशी जखमी आहेत. दिलदार मारणे व मोजिन कुरई अशी जखमींची नावे आहेत. सदर घटना दुपारच्या सुमारास झाल्यामुळे मांडवा जेट्टीवर प्रवाशांची गर्दी होती. अचानक पेट घेतलेल्या बोटीला पाहून प्रवाशांमध्ये देखील घबराट पसरली होती.

मांडवा जेट्टीवर उभी केलेली ही स्पीड बोट चव्हाण इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची खासगी ७ आसनी एसी बोट असून बोटीवरील एसीसाठी बोटीत जनरेटर बसवलेला होता. बोटीवरील खलाशांना दुपारी एकच्या दरम्यान धूर येताना दिसल्याने त्यांनी जनरेटरचा बॉक्स उघडला असता त्यामध्ये आग लागली होती. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये ते काही प्रमाणात भाजले गेले. नंतर आग अधिकच भडकल्याने दोघांनी बोटीतून पाण्यात उड्या मारल्या. बाजूला असलेल्या बोटीच्या खालाशांनी त्यांना वाचवले.

लोकसभा मतदारसंघाचा पीपीटी सादर, आढावा घेतला, चाचपणीला सुरूवात, दादांच्या दाव्यानंतर पवारांचा शड्डू ठोकला
दुर्घटनेची बातमी समजल्यानंतर मांडवा पोलिसांनी तसेच बंदर अधिकारी शिरीष मानकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व जखमींना अलिबाग येथील हॉस्पिटलमध्ये हलवले. सदरची बोट जेट्टीपासून सुमारे ३०० मीटर अंतरावर उभी करण्यात आली होती असे सांगण्यात आले. दरम्यान, पेटलेली बोट हेलकावे खात जेट्टीच्या किनाऱ्यावर आली होती. आरसीएफ अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर त्यांनी येवून बोटीवरील आग विझवली.

विधानसभेत राष्ट्रवादी युवकची मोठी फळी निवडून जाईल… तरुणांच्या उमेदवारीवर पवार काय म्हणाले?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed