म. टा. प्रतिनिधी, धाराशिव : धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाचे आरक्षण लागू करून त्याची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी हजारो धनगर समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी धडक मोर्चा काढला. पिवळे झेंडे आणि घोषणा फलक हातात घेत हजारो आंदोलक मोर्चात सहभागी झाले.
धाराशिव जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वतीने धडक मोर्चा काढून एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी करण्यात आली. प्रत्येक निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून आरक्षणाचे आश्वासन दिले जाते. मात्र प्रत्यक्षात कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यात यावे व सर्व योजनांचा लाभ धनगर समाजाला देण्यात यावा. ‘धनगड’ आणि ‘धनगर’ हे एकच असून शब्दाचा खेळ सरकारने बंद करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

लेडीज क्लब येथून मोर्चाची सुरूवात झाली. संत गाडगेबाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लहुजी वस्ताद साळवे चौकमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मुलींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात मेंढरे, धनगरी ढोल आणि भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. धनगर आरक्षणाचा मुद्दा निकालात काढण्याची जोरदार मागणी करण्यात आली.