• Sat. Sep 21st, 2024
ललित पाटील प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठी माहिती, ३ महिने आधीपासूनच होतं प्लॅनिंग….

पुणे : ससून रुग्णालयातून चालविण्यात येणारे अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट उघडकीस आल्यानंतर ललित पाटील पळून गेला. मात्र, त्यापूर्वी ३ महिने आधीपासूनच ललितने पळून जाण्याचा प्लॅन केला होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये एक गुन्हा अमली पदार्थ तस्करीचा आहे. तर, दुसरा गुन्हा न्यायालयीन कोठडीअंतर्गत ससून रुग्णालयात उपचार घेत असताना, तेथून पळून गेल्या प्रकरणी दाखल आहे. या दुसऱ्या गुन्ह्यात ललित पाटीलसह त्याचा चालक सचिन वाघ या दोघांना बुधवारी प्रथमच अटक करण्यात आली. त्यांना गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

ललित पाटीलला ७ दिवस आणि वाघ याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यावेळी पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टनुसार, ललितने ३ महिनेआधीच पळून जाण्याचा प्लॅन केला होता. त्यासाठी ललित वाघ याला भेटण्यासाठी २ ते ३ वेळा ससून रुग्णालयातून बाहेर गेला होता.

वाघ, ललितचेसोबत पलायन

ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला. त्यावेळी सचिन वाघ त्याच्यासोबत होता. दोघेही परराज्यात सोबतच गेले होते. मुंबई पोलिसांनी त्यांना बंगळुरू येथून अटक केली. दरम्यान, वाघ आणि ललित पाटील दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. ललितला पळून जाण्याच्या कटात वाघने सहकार्य केले. पैसे आणि कार उपलब्ध करून दिली. त्यामुळे या प्रकरणी अधिक चौकशीसाठी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी सहायक सरकारी वकील नीलिमा यादव इथापे यांनी केली. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी त्यांची मागणी मान्य केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed