• Sat. Sep 21st, 2024

बीडची जाळपोळ १० टोळ्यांकडून, ६ टोळीप्रमुखांना अटक, शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या भाच्याला अटक

बीडची जाळपोळ १० टोळ्यांकडून, ६ टोळीप्रमुखांना अटक, शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या भाच्याला अटक

बीड : बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान ३० ऑक्टोबर रोजी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर विविध पथके स्थापन करत पोलिसांनी आतापर्यंत २६२ आरोपींना अटक केली असून यामध्ये दहा टोळ्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. या दहापैकी सहा टोळ्यांचे प्रमुख गजाआड असून आणखी चार टोळ्यांच्या प्रमुखांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली. अटकेत असलेला आरोपी पप्पू शिंदे हा शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचा भाचा आहे. शिंदेवर यापूर्वी काही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का? हे तपासण्याचे काम देखील सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी मामा कुंडलिक खांडे जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत, यांच्याही विरोधात अनेक क्राईमच्या आणि दोन नंबरच्या आणि गुन्हेगार प्रवृत्तीच्या गोष्टी या समोर आल्या होत्या. मात्र, ३० तारखेला झालेली जाळपोळ आणि हिंसाचार हा मराठा आरक्षण आंदोलन सुरु असताना झाली असली तरी यात जे दहा ग्रुप होते. त्या दहा पैकी एका ग्रुपचा प्रमुख म्हणून कुंडलिक खांडे यांचा भाचाच आता समोर आला आहे.
बीडमधील आणखी एक अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक बुडाल्याची अफवा, अचानक सर्व शाखा बंद, ठेवीदारांमध्ये खळबळ
दहा ग्रुप पैकी सहा ग्रुपचे म्होरके आज पोलीस प्रशासनाने जेरबंद केले जरी असले तरी यातील अनेक आरोपींना देखील त्यांच्यासोबत अटक करण्यात आलं आहे. मात्र, प्रकर्षाने नाव घेतलं जात आहे ते कुंडलिक खांडे यांच्या भाच्याचं कारण इतर ग्रुपचे प्रमुख यांची नावं पोलीस प्रशासनानं समोर आणलेली नाहीत.

बीडमधील आणखी एक अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक बुडाल्याची अफवा, अचानक सर्व शाखा बंद, ठेवीदारांमध्ये खळबळ
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असललेल्या कुंडलिक खांडे यांच्या भाच्याचं नाव समोर आलेलं आहे. पप्पू शिंदे याच्या अटकेनंतर पोलीस आणखी इतर आरोपींना कधी पकडणार याकडे लक्ष लागलं आहे.
शिक्षक भरती रखडली; महिलेचा माध्यमांसमोरच शिक्षण मंत्र्यांना प्रश्न, दीपक केसरकर भडकले, म्हणाले…

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed