• Sat. Sep 21st, 2024
विखे पाटील म्हणाले, राजीनामा द्या आणि मग भूमिका मांडा, आता भुजबळांकडून रोखठोक उत्तर

नाशिक : मी जेव्हा पाहिजे तेव्हा राजीनामा द्यायला तयार आहे. फक्त ‘नेत्यांचा’ निरोप यायला हवा मग विषय संपला, असे स्पष्ट वक्तव्य राज्याचे अन्न व नागरी पुरवठ मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये करून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रत्युत्तर दिलं. ओबीसींबाबतची भूमिका मांडायची असेल तर छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. अन्यथा त्यांच्याबाबत वेगळी भूमिका घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे, असे वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले होते. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

राज्यात मागच्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला असून छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेला त्यांना राज्यभरातून विरोध होऊ लागला आहे. त्याचबरोबर भुजबळांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला असून शिंदे समिती बरखास्तीची मागणी केली आहे. त्यांच्या या भूमिकेवर महसूलमंत्री विखे पाटील यांनी वक्तव्य करताना त्यांच्याबाबत वेगळी भूमिका घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे अशी भूमिका मांडली. यावरच सत्ताधारी असलेल्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्येच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जुंपल्याचे दिसत आहे.

भुजबळ तुम्ही राजीनामा द्या, मग बोला, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून घरचा आहेर

मंत्री विखे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात छगन भुजबळ यांना विचारले असता भुजबळ म्हणाले, विखे आमचे मित्र आहेत. जेव्हा पाहिजे तेव्हा मी राजीनामा द्यायला तयार आहे. त्यांनी त्यांच्या नेत्याकडे सांगितलं आणि निरोप आला की बस्स विषय संपला…. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा निरोप आला पाहिजे असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. एकूणच सत्तेत असलेल्या छगन भुजबळ आणि विखे पाटील यांच्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप होऊ लागल्याने येत्या काळात हे प्रकरण काय वळण घेतंय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठा समाज आरक्षणात येणार, छगन भुजबळांकडून विषय भरकटवण्याचं काम, मनोज जरांगे यांचं प्रत्युत्तर
नाशिकसह राज्यभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांना बऱ्याच दिवसानंतर मतदारसंघाचा दौरा करत असल्याबाबत विचारले असता यावर देखील बोलताना भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. भुजबळ म्हणाल मला मतदारसंघात जाण्यासाठी वेळ मिळाला नव्हता. थोडे दिवस शांतता ठेवावी असे मला वाटले. त्यात गावबंदी असल्यामुळे मी जाणे टाळले असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनाही त्यांनी टोला लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed