• Sat. Sep 21st, 2024

सोशल मीडिया अकाऊंट बंद पाडण्याचा प्रयत्न, रोहित पवार म्हणाले तुम्ही कितीही ताकद लावा…

सोशल मीडिया अकाऊंट बंद पाडण्याचा प्रयत्न, रोहित पवार म्हणाले तुम्ही कितीही ताकद लावा…

वाशिम : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची सध्या युवा संघर्ष यात्रा सुरु आहे. या यात्रेच्या निमित्तानं ते विविध प्रश्नांवर युवकांसोबत संवाद साधत आहेत. रोहित पवार यांनी आज त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये रोहित पवार यांनी एक गंभीर आरोप केला आहे. युवा संघर्ष यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता काही अदृश्य शक्ती खोट्या तक्रारी करत असून माझं सोशल मीडिया अकाऊंट बंद पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. रोहित पवार यांनी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करता येत नसल्याचा स्क्रीनशॉट देखील प्रसिद्ध केला आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना आवाज दिला असल्याने तसेच युवा संघर्ष यात्रेला मिळता प्रतिसाद बघता काही अदृश्य शक्तिकडून खोट्या तक्रारींचा सपाटा लावून तसेच दबावतंत्राचा वापर करून माझे सोशल मीडिया अकाउंट बंद करण्याचा घाट घातला जात आहे. अशा अदृश्य शक्तींना एक सांगू इच्छितो की, तुम्ही कितीही ताकद लावा आम्ही लोकांचा आवाज बुलंद करतच राहू, असं प्रतिआव्हान रोहित पवार यांनी विरोधकांना दिलं आहे.

पीक विम्याचा मार्ग मोकळा, ३५ लाख शेतकऱ्यांना मिळणार १,७०० कोटी

रोहित पवार यांचं सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

रोहित पवार यांनी राज्यातील प्रलंबित असलेली नोकरभरती, युवकांचे प्रश्न या मुद्यांवर युवा संघर्ष यात्रा सुरु केली होती. ही यात्रा पुणे ते नागपूर अशी काढण्यात आली आहे. ही यात्रा मराठा आरक्षण आंदोलनामुळं स्थगित करण्यात आली होती. सध्या या यात्रेचा दुसरा टप्पा सुरु करण्यात आला आहे. या यात्रेच्या निमित्तानं ते युवकांशी आणि राज्यातील जनतेशी संवाद साधत असून त्यांनी विविध मुद्यांवर राज्य सरकारवर टीका केली आहे.
दारु सोडण्यावरुन वाद, मेहुण्याचे भाऊजीवर जीवघेणे वार, मरणासन्न अवस्थेत नाल्यात टाकलं अन्…

दुष्काळावरुन देखील सरकारवर टीका

रोहित पवार यांनी संपूर्ण राज्य दुष्काळाच्या भयाण संकटात सापडले असून देखील राज्य सरकार अद्यापही गंभीर दिसत नाही, असं म्हटलं आहे. आधी दुष्काळ जाहीर करताना केवळ चाळीस तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले, आम्ही सर्वांनी पाठपुरावा केला तेव्हा बाकी तालुके समाविष्ट केले खरे… पण नंतरच्या तालुक्यांना किती मदत मिळेल? याबाबत शासनाने काहीही स्पष्टता दिलेली नाही, असं रोहित पवार म्हणाले. आता तर त्याहून पुढे जात शासनाने कहरच केला, दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या मदतीसाठी केंद्राकडे जे प्रस्ताव पाठवले जातात, ते प्रस्ताव केवळ चाळीस तालूक्यांचेच पाठवले आहेत. याचाच अर्थ उर्वरित तालुक्यांना एक रुपयाची देखील मदत मिळणार नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांना अशाप्रकारे वाऱ्यावर सोडणे योग्य नाही, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
मुसळधार पावसाने झोडपले; गारपिटीमुळे ९० मेंढ्या व शेकडो बगळे मृत्युमुखी

युवकांसोबत व्यायाम, फिटनेस जपत रोहित पवारांकडून युवा संघर्ष यात्रेची सुरुवात

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed