• Sat. Sep 21st, 2024
वडील २६/११ च्या हल्ल्यातील जखमांनी गतप्राण, लेकाला अवकाळी पावसाने ओढून नेलं

सोलापूर : सोलापुरात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. मंगळवारी रात्रीपासून पावसाने रौद्ररूप धारण केले होते. बुधवारी पहाटेपर्यंत पावसाने कहर माजवला. सोलापुरातील अनेक सखल भागात पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. मंगळवारी रात्री सोलापूर शहरात कुंभारी वेस परिसरात असलेल्या नाल्याजवळून दुचाकीवरून जाताना तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. सलाम दलाल (वय ३५ वर्ष, रा. जोडभावी पेठ, सोलापूर) याचा मृतदेह सकाळी नाल्यात आढळून आला.

नाल्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह पाहून कुटुंबियांना दुःख अनावर झाले होते. बुधवारी सकाळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे. नातेवाईक व मित्रांनी शासकीय रुग्णालयात प्रचंड गर्दी केली आहे.

मंगळवारी रात्री पावसाचे रौद्ररूप

राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. मंगळवारी सायंकाळपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाने रिमझिम स्वरूपात हजेरी लावली होती. रात्री 11 वाजल्यापासून पावसाने धुँवाधार सुरुवात केली. पावसामुळे शहरातील सखल भागात असलेल्या घरांत पाणी शिरले. जवळपास दोन तास सोलापूर शहरात दमदार पाऊस होता. रात्रीच्या सुमारास पाऊस असल्याने रस्त्यावर वर्दळ नव्हती. रात्रपाळी करून घरी जाणाऱ्याची मात्र तारांबळ उडाली होती. मार्केट यार्डात कांद्याच्या विभागात देखील पाणी शिरले होते. रात्रीच्या सुमारास कांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची देखील मोठी फजिती झाली.

अश्लील व्हिडिओवरुन ब्लॅकमेल, विश्वस्तांकडून १ कोटीची खंडणी, कृषी सहाय्यक महिलेवर मोठी कारवाई

तरुण नाल्यात वाहून गेला

सलाम दलाल हा तरुण पावसामुळे शहरात असलेल्या कुंभारी वेस परिसरात आडोशाला थांबला होता. जवळपास दोन तास मुसळधार पावसामुळे कुंभारी वेसमधील नाला तुडुंब भरून वाहत होता. पाण्याचा प्रवाह देखील जबरदस्त होता. पाऊस थांबल्याने सलाम दलाल हा तरुण दुचाकीवरून निघाला. परंतु पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने सलामला अंदाज आला नाही. दुचाकी घेऊन जाताना ती घसरली व तो पाण्यासोबत वाहून गेला. पत्नी आणि मुलांनी रात्रभर वाट पाहिली, मात्र सलाम काही घरी परतला नाही. अखेर सकाळी त्याच्या मृत्यूची वार्ता घरापर्यंत पोहोचली. सलाम याच्या मृत्यूची वार्ता ऐकताच कुटुंबियांना दुःख अनावर झाले. त्यांनी नाल्याच्या ठिकाणी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून सलामचा मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे.

पावसाने झोडपले, आमदार लंके रात्रभर अस्वस्थ, भल्या सकाळीच शेतकऱ्याच्या बांधावर

वडील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात झालेले जखमी

सलाम याचे वडील साबीर दलाल हे मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. चौदा वर्षांपूर्वी वडिलांना गोळी लागून पाय निकामी झाल्याने घरची सर्व जबाबदारी सलामवर आली होती. चौदा वर्षांपासून दिव्यांग बापाची सेवा करत सलामने कुटुंबाची सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली होती. मात्र सलामचा नाल्यात वाहून मृत्यू झाला. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सलाम दलाल याला तीन अपत्य व पत्नी आहे. शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची व मित्रांनी प्रचंड गर्दी केली आहे.

माझं सारं पीक झोपलं, काहीच उरलं नाही; अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी, उभं शेत आडवं

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed