• Sat. Sep 21st, 2024
मुंबईत नौदलातील २० वर्षीय महिला अग्निवीराने संपवलं जीवन, पोलीस तपासात गुंतले

मुंबई: नौदलातील २० वर्षीय अग्निवीर महिला नौसैनिकाने सोमवारी रात्री आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही महिला मालवणी येथील नौदलाच्या ‘आयएनएस हमला’ तळावर लॉजिस्टिक्सचे प्रशिक्षण घेत होती. ती मूळ केरळची होती. नौदलात ‘अग्निवीर महिला’ या पदावर तरुणींची वर्षभरापासून भरती सुरू आहे.
भारत गौरव रेल्वेतील ४० प्रवाशांना विषबाधा, पुणे रेल्वे स्थानकावर तातडीचे उपचार
या तरुणींची प्रामुख्याने विविध तळांवर नियुक्ती केली जाते. त्याआधी त्यांना सहा महिन्यांचे मूळ प्रशिक्षण दिले जाते. या मूळ प्रशिक्षणानंतर त्यांच्या विशेष विभागानुसार त्यांना एक ते तीन महिन्यांचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. अग्निवीर अपर्णा नायर यांचे मूळ प्रशिक्षण पूर्ण झाले होते. त्यानुसार त्या नौदलात ‘नौसैनिक’ या नात्याने सेवा देत होत्या. नौदलाच्या ‘लॉजिस्टिक्स’ (पुरवठा व सामग्री नियोजन) या विभागात त्यांची निवड झाली होती. या विभागातील नौसैनिकांना आयएनएस हमला तळावर प्रशिक्षण दिले जाते. त्यानुसार अग्निवीर अपर्णा त्या तळावर प्रशिक्षण घेत होत्या.

शिक्षक भरतीची पुढील प्रकिया होत नाहीय, किती वेळ वाट बघायची; महिलेचा प्रश्न, दिपक केसरकरांचा पारा चढला

‘अग्निवीर अपर्णा यांनी सोमवारी रात्री गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले. नौदलात कुठल्याही अनैसर्गिक मृत्यूची न्यायिक चौकशी होते. हा मृत्यू अनैसर्गिक असल्याने त्याबाबत चौकशीचे आदेश नौदलाने दिले आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडूनदेखील तपास केला जात आहे,’ असे नौदलातील सूत्रांनी सांगितले. अग्निवीर अपर्णा या मूळच्या केरळच्या आहेत. त्यामुळे मृतदेहाचे शवविच्छेदन होऊन तो कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाणार आहे. त्यासाठी कुटुंबीयांना केरळहून बोलवण्यात आले आहे. त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्यामागे मानसिक तणाव असल्याचे सकृत दर्शनी दिसत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed